Join us
Daily Top 2Weekly Top 5

Birthday Special : खास आहे अशोक सराफ यांची प्रेमकहाणी, म्हणून मुंबईऐवजी गोव्यात केले होते लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 11:52 IST

मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार अशोक सराफ यांचा आज वाढदिवस.

ठळक मुद्देअशोक सराफ यांचा ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा निवेदिता फक्त सहा वर्षांच्या होत्या. 

तुमचे आमचे आवडते अशोक मामा  आणि मराठी चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. पडद्यावर विविधांगी भूमिका साकारणारे, प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अशोक सराफ रिअल लाईफमध्ये अतिशय शांत स्वभावाचे आहेत, हे वाचून आश्यर्च वाटेल.   4 जून 1947 रोजी मुंबईत अशोक सराफ यांचा जन्म झाला. अभिनेत्री निवेदिता जोशी या अशोक सराफ यांच्या पत्नी़ प्रेमाला वयाचे बंधन नसते, असे म्हणतात. अशोक सराफ व निवेदिता यांच्याबाबतीत असेच म्हणता येईल. अशोक सराफ व निवेदिता यांच्यात 18 वर्षांचे अंतर आहे.  ते पत्नीपेक्षा 18 वर्षांनी मोठे आहेत. 

वाचून आश्चर्य वाटेल, पण अशोक सराफ यांचा ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा निवेदिता फक्त सहा वर्षांच्या होत्या. विशेष म्हणजे, पुढे निवेदिता यांना अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. एकत्र काम करता करता दोघांची चांगली मैत्री झाली आणि पुढे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

अशोक सराफ व निवेदिता यांची पहिली भेट ‘डार्लिंग डार्लिंग’ या नाटकाच्या वेळी झाली होती. ही माझी छोटीशी मुलगी, असे म्हणत निवेदिताच्या बाबांनी तिची अशोक सराफ यांच्याशी ओळख करून दिली होती. ‘नवरी मिळे नव-याला’ या सिनेमाच्या सेटवर निवेदिता व अशोक यांच्यात प्रेम फुलले. ‘धुमधडाका’च्या सेटवर हे प्रेम आणखीच बहरले. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण प्रत्येक प्रेमकहाणीत एक ट्विस्ट असतोच. तो यांच्याही प्रेमकहाणीत होता. निवेदिताने चित्रपटसृष्टीतील व्यक्तिशी लग्न करू नये, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. परंतु निवेदिता ठाम होत्या़ लग्न करणार तर अशोक सराफ यांच्याशीच, असे म्हणून त्या अडून बसल्या. अखेर घरच्यांना त्यांचा हा निर्णय मान्य करावा लागला. अशोक सराफ यांच्या घरून मात्र लगेच या लग्नाला परवानगी मिळाली होती.

अखेर निवेदिता व अशोक सराफ यांचे लग्न ठरले़. लग्न झाले गोव्यात. होय, यामागचे एक खास कारण होते.

गोव्याच्या मंगेशीच्या मंदिरात दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. याच मंदिरात लग्न का, तर मंगेशी हे अशोक सराफ यांचे कुलदैवत आहे. त्यामुळे या ठिकाणी  ठिकाणी लग्न करण्याचा अशोक सराफ यांनी निर्णय घेतला होता.

अशोक सराफ यांच्यासोबत लग्न झाले तेव्हा निवेदिता यांचे मराठी सिनेसृष्टीतील करिअर जोरात होते. पण लग्नानंतर निवेदिता यांनी कामातून ब्रेक घेतला. एक दोन वर्षे नाही तर तब्बल 13 वर्षांचा ब्रेक. मुलाच्या जन्मानंतर निवेदिता यांनी सिनेसृष्टीपासून ब्रेक घेण्याचे ठरवले. पण अशोक सराफ यांचे करिअर मात्र अखंड सुरु राहिले. अशोक सराफ यांना याची जाण आहे. मी केवळ निवेदितामुळेच पुढे जाऊ शकलो. आज मी जे काही आहे, ते तिच्याचमुळे अशी कबुली ते आजही देतात, ते याचमुळे. 

टॅग्स :अशोक सराफ