Join us

मंजिरीचं 'ते' वाक्य अन् प्रसाद ओकने घेतला घर सोडायचा निर्णय; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 14:59 IST

Manjiri oak: मंजिरीने तिचं बोलणं सुरु केलं आणि प्रसादला आल्या पावली परत मागे फिरावं लागलं.

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल म्हणजे मंजिरी ओक (manjiri oak) आणि प्रसाद ओक (prasad oak).  कलाविश्वात सक्रीय असलेली ही जोडी सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर ते चाहत्यांच्या भेटीला येत असतात. यात अनेकदा ते काही फनी व्हिडीओदेखील शेअर करतात. असाच एक भन्नाट व्हिडीओ मंजिरीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या लोकप्रिय होत नाही.

मंजिरीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत प्रसाद ओक सुद्धा दिसून येत आहे. विशेष म्हणजे बायकोने फक्त महत्त्वाचं बोलायचंय म्हटल्यावर नवऱ्याची कशी घाबरगुंडी उडते हे तिने मजेशीर अंदाजात सांगितलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये प्रसाद आणि मंजिरी नुकतेच बाहेरुन घरी आले असतात. आणि, त्याचवेळी 'मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय,' असं मंजिरी त्याला सांगते. पण, मंजिरीचं हे बोलणं ऐकून प्रसाद आल्या पावली पुन्हा मागे फिरुन घरातून पळ काढतो.

दरम्यान, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय” हे वाक्य ऐकल्यावर नवऱ्याच्या पोटात गोळा का येतो ???, असं कॅप्शन देत मंजिरीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अमृता खानविलकर, समीर चौघुले, स्वप्नील जोशी या कलाकारांनीही भन्नाट कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :प्रसाद ओक सेलिब्रिटीसिनेमा