Join us

तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 12:31 IST

माझी प्रारतना या आगळ्यावेगळ्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीत त्याची खास छाप पाडणार यात शंका नाही. बातमीवर क्लिक करुन ट्रेलर नक्की बघा

मराठी चित्रपटसृष्टीत एका सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना चांगली उत्सुकता आहे. या सिनेमाचं नाव म्हणजे 'माझी प्रारतना'. पद्माराज राजगोपाल नायर दिग्दर्शित "माझी प्रारतना" (majhi prartana movie trailer)  हा सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रेम म्हणजे केवळ भावना नाही, तर जगण्याची एक जाणीव आहे आणि ही जाणीव सादर करणारा हा उत्कृष्ट ट्रेलर आहे. 

'माझी प्रारतना'चा ट्रेलर

'माझी प्रारतना' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आपण पाहू शकतो की, प्रेम जेव्हा अडचणींवर मात करत टिकतं, तेव्हाच त्याची खरी ताकद समोर येते. अशाच प्रेमाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारा हा ट्रेलर आहे ज्यात  सुदंर चित्रीकरण,उत्कृष्ट अभिनय, मधुर संगीत आणि इमोशन्स आपण पाहू शकतो. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर कथेबाबतची उत्कंठा आणखीनच वाढली आहे.

'माझी प्रारतना' हा चित्रपट ब्रिटिश काळातील ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ही एक संगीतप्रधान कथा असून, प्रेम, विश्वासघात आणि जगण्याच्या जिद्दीचा अद्भुत प्रवास मांडते. चित्रपटात पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप प्रमुख भूमिकेत आहेत, तसेच मराठीतील अनेक दिग्गज कलाकारही यात सहभागी आहेत.

कधी रिलीज होणार सिनेमा

एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत "माझी प्रारतना" या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर ह्यांनी केलं आहे, पद्माराज नायर फिल्म्स ह्यांची निर्मिती असून संगीत विश्वजित सी.टी. यांनी दिले आहे. "माझी प्रारतना" हा सिनेमा ९ मे २०२५ पासून जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. उपेंद्र लिमयेची या सिनेमात खास भूमिका आहे

टॅग्स :मराठी चित्रपटमराठी अभिनेता