Join us
Daily Top 2Weekly Top 5

महेश कोठारेंना मातृशोक, सरोज कोठारे यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 08:53 IST

जानेवारी महिन्यातच त्यांच्या वडिलांचंही निधन झालं होतं.

मराठी दिग्दर्शक महेश कोठारेंच्या (Mahesh Kothare) आई सरोज कोठारे (Saroj Kothare) यांचं काल निधन झालं. त्या ९३ वर्षांच्या होत्या. जानेवारी महिन्यातच त्यांच्या वडिलांचंही निधन झालं होतं. आता त्यांच्या डोक्यावरुन मायेचं छत्रही हरपलं आहे. सरोज कोठारे  यांच्या पश्चात मुलगा, नातू, सून, आणि नातसून आणि पणती असा परिवार आहे.

नातू आदिनाथ कोठारे आणि  नातसून उर्मिला कोठारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. स्व. सौ. सरोज अंबर कोठारे (जेनमा) (१९/०६/१९३० - १५/०७/२०२३) संपूर्ण कोठारे कुटुंबाकडून भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना' ...अशी पोस्ट त्यांनी केली आहे. 

महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचं सहा महिन्यांपूर्वीच २१ जानेवारी रोजी निधन झालं होतं. ते ९६ वर्षांचे होते. पाठोपाठ आईही गेल्याने महेश कोठारे यांच्यासाठी हा मोठा मानसिक धक्का आहे.त्यांना आधार देण्यासाठी  त्यांच्यासोबत सध्या त्यांचं संपूर्ण कुटुंब आहे.  

टॅग्स :महेश कोठारेआदिनाथ कोठारेउर्मिला कानेटकर कोठारे