Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेवर आली चोरी करण्याची वेळ; नक्की काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 19:09 IST

एका मालिकेत निखिल बने चोराची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो सध्या टेलिव्हिजन विश्वात तुफान गाजत आहे. या शोसोबतच त्यातील कलाकारही प्रेक्षकांना आपल्यातलेच वाटतात.  प्रत्येक कलाकाराचा स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे निखिल बने. पण या प्रसिद्ध अभिनेत्यावर चोरी करण्याची वेळ आलीय. त्यांचा एक व्हिडीओ समोर आहे, ज्यामध्ये तो चोरी करताना दिसतोय. खऱ्या आयुष्यात नाही तर छोट्या पडद्यावरील एका मालिकेत निखिल बने चोराची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.

‘खुमासदार नात्यांचा गोडा मसाला’ ही मालिका ३ ऑक्टोबरला सोनी मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत निखिल बने म्हत्त्वाची भुमिका साकारताना पाहायला मिळतोय.  मालिकेच्या सेटवरच्या शूटिंगदरम्यानचा खास व्हिडीओ समोर आलायं. यामध्ये तो अंगावर घोंगडी घरात घुसुन चोरी करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. 

निखिल बनेचा स्वतंत्र चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर त्याची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. मोठा कलाकार होऊनही आजही तो भांडूपच्या चाळीत राहतो. आता तर त्याला मराठी सिनेमा मिळाला असून सध्या त्याचं करिअर जोरदार आहे. ‘बॉईज ४’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.  ‘बॉईज ४’ चित्रपट येत्या २० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेतासेलिब्रिटी