Join us

आर्या आंबेकरला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार प्रदान! भावना व्यक्त करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 11:33 IST

आर्या आंबेकरला सर्वोत्कृष्ट राज्य शासनाचा गायिकेचा पुरस्कार प्रदान! भावना व्यक्त करत म्हणाली-"माझ्या गाण्यावर आजवर..."

Aarya Ambekar: 'सारेगमप' लिटील चॅम्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्या आंबेकर घराघरात पोहोचली. आर्याने आजवर अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांची गाणी गायली आहेत. आपल्या आवाजाने तिने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. दरम्यान, काल मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा सायंकाळी ६:३० वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी आर्या आंबेकरला तिच्या गायन क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आलं. याचनिमित्ताने आर्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद भावना व्यक्त केल्या आहेत. 

आर्या आंबेकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याची क्षणचित्रे शेअर केली आहेत. 'चंद्रमुखी' चित्रपटातील 'बाई गं' गाण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान, या पोस्टमध्ये तिने लिहिलंय की,"काल पार पडलेल्या 60व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मला सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार प्राप्त झाला. यासाठी मी महाराष्ट्र शासनाची, अजय दादा, अतुल दादा आणि चंद्रमुखी टीमची ऋणी आहे. माझ्यावर आणि माझ्या गाण्यावर आजवर तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम केलंत..तुमचे असेच आशीर्वाद कायम पाठीशी राहुदेत." 

उत्तम आवाज आणि सुंदर अभिनय अशा दुहेरी भूमिका साकारणारी आर्या आंबेकर 'सा रे ग म पा लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचली. 'हृदयात वाजे समथिंग', 'बाई गं', 'कितीदा नव्याने तुला आठवावे' यांसारख्या अनेक गाण्यांमधून ती प्रसिद्धझोतात आली. 

टॅग्स :आर्या आंबेकरमराठी चित्रपटसेलिब्रिटी