Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुशल बद्रिके आणि विजू मानेंनी प्रवीण तरडेला दिल्या ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा मजेशीर Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 15:22 IST

अभिनेता कुशल बद्रिकेने आणि दिग्दर्शक विजू माने यांनी प्रवीण तरडेसाठी खास व्हिडीओ शेअर केला आहे. 

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सोमवारी ( ११ नोव्हेंबर ) त्यांचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने संपूर्ण मराठी कलाविश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अभिनेता कुशल बद्रिकेने आणि दिग्दर्शक विजू माने यांनीदेखील प्रवीण तरडेसाठी खास व्हि़डीओ शेअर केला आहे. 

कुशल बद्रिकेने व्हिडीओ शेअर केला आहे. "प्रवीण तरडे यांच्या गोल्डन जुबलीला जाता न आल्याबद्दलचा हा जाहीर माफीनामा…वाढदिवसाच्या शुभेच्छा यार", असं कॅप्शन लिहलं. व्हिडीओ कुशल बद्रिके हा कवितेमधून प्रवीणला शुभेच्छा देतो, तसेच प्रवीणसाठी  ५० कविता लिहिल्याचं सांगतो. तर कुशलची ही अजब कविता ऐकून वैजू माने हैरान झाल्याचे दिसून येतात. तर व्हिडीओच्या शेवटी मजेशीर कुशल, विजू माने आणि प्रवीण यांचा मजेशीर फोटो दिसून येतो. हा  व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आजवर मराठी सिनेसृष्टीत प्रवीण तरडे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. इतकंच नव्हे तर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही छाप पाडली आहे. आजवर नाटक, मालिका, चित्रपट व वेबसीरिज या माध्यमांमधून अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली. अभिनयाबरोबरच लेखन आणि दिग्दर्शनातूनही प्रेक्षकांच्या मनात घर केलेय. 'मुळशी पॅटर्न', 'देऊळ बंद', 'धर्मवीर' या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमरीत्या पेलवली. 

टॅग्स :कुशल बद्रिकेविजू मानेप्रवीण तरडे