Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रांती रेडकरच्या जुळ्या मुलींना पाहिलंत का? सोहम-पूजाच्या लग्नात पहिल्यांदाच दिसली छबील-गोदोची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:27 IST

क्रांती रीलमधून तिच्या जुळ्या लेकींच्या गमतीजमतीही सांगत असते. पण, व्हिडीओत ती कधीच तिच्या मुलींचा चेहरा दाखवत नाही. आता पहिल्यांदाच क्रांतीच्या जुळ्या मुली कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. 

क्रांती रेडकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांमध्ये क्रांतीने काम केलं आहे. जत्रा या सिनेमामुळे तिला लोकप्रियता मिळाली. क्रांती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अनेक मजेशीर रील व्हिडीओ ती बनवत असते. क्रांती रीलमधून तिच्या जुळ्या लेकींच्या गमतीजमतीही सांगत असते. पण, व्हिडीओत ती कधीच तिच्या मुलींचा चेहरा दाखवत नाही. आता पहिल्यांदाच क्रांतीच्या जुळ्या मुली कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. 

मराठी कलाविश्वातील नवविवाहित कपल सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांचा लग्नाचं रिसेप्शन नुकतंच पार पडलं. सोहम-पूजाच्या लग्नाच्या रिसेप्शनला कलाविश्वातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. क्रांतीनेदेखील पती समीर वानखेडे आणि तिच्या दोन मुलींसह रिसेप्शनला उपस्थित राहत सोहम-पूजाला शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रांतीच्या दोन मुलींचा चेहरा कॅमेऱ्यात दिसला. सोहम-पूजाच्या रिसेप्शन सोहळ्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये क्रांती पती समीर वानखेडेंसह स्टेजवर दिसत आहे. तिच्यासोबत तिच्या दोन मुली छबील आणि गोदोदेखील आहे. छबील-गोदोला पाहून चाहतेही खूश झाले आहेत.

 

क्रांतीने २०१७ मध्ये समीर वानखेडे यांच्याशी लग्न करत संसार थाटला. लग्नानंतर काही वर्षांनी क्रांतीने जुळ्या मुलींना जन्म दिला होता. तिच्या मुलींची नावं झिया आणि झायदा अशी आहेत. लाडाने क्रांती तिच्या मुलींना छबील आणि गोदो नावाने हाक मारते. छबील आणि गोदो आता ७ वर्षांच्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kanti Redkar's twins spotted at Soham-Puja wedding reception.

Web Summary : Kranti Redkar's twin daughters, previously unseen, were photographed at Soham Bandekar and Puja Birari's wedding reception. Kranti, along with her husband Sameer Wankhede and daughters Chhabil and Godo, attended the event, marking the first public appearance of the twins.
टॅग्स :क्रांती रेडकरसेलिब्रिटी