Join us
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोट झाला नसला तरी पत्नीपासून वेगळे राहतात नाना पाटेकर, पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 20:02 IST

सिनेमात येण्यापूर्वी नाना पाटेकर रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग रंगवण्याचे काम करायचे. ते अप्लाइड आर्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. ते एक उत्कृष्ट स्केच आर्टिस्ट आहेत.

आपला दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकणाऱ्या आणि एक उत्तम माणूस असणाऱ्या नाना पाटेकर यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. नाना पाटेकर यांचे पाय आजही जमिनीवरच आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये. त्यांच्या आयुष्यातल्या खास किस्सेही रंगत असतात. नाना यांच्या फिल्मी करिअरप्रमाणे त्यांचे खासगी आयुष्यही चर्चेत असते.

नाना पाटेकर यांच्या प्रमाणे त्यांची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अभिनेत्री निलकांती पाटेकर यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने रसिकांची पसंती मिळवली आहे.'आत्मविश्वास' या चित्रपटानंतर त्या अभिनयक्षेत्रापासून दूर गेल्या होत्या.'बर्नी' या चित्रपटातून त्यांनी कमबॅक केले होते.

नाना सुरुवातीपासून त्यांच्या खासगी आयुष्यावर बोलणे टाळतात. त्यामुळे फार कमी लोकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी माहिती आहे. खरंत नाना एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे प्रचंड चर्चेत असायचे. याच कारणामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचे बोलले जाते. नाना यांचे पत्नीसोबतही वाद व्हायचे. अखेर निलकांती पाटेकर यांनीच नाना पासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या कित्येक वर्षापासून दोघे वेगळे राहत असले तरी नाना आवर्जुन वेळ काढून निलकांती यांना भेटायला जात असतात.

नाना त्यांच्या आईंसोबत ७२० चौ. फुटाच्या वन बीएचके फ्लॅटमध्ये वास्तव्याला होते. ९०च्या दशकात त्यांनी हा फ्लॅट केवळ १.१ लाखात खरेदी केला होता. नाना आवड म्हणून नाही तर परिस्थितीमुळे अभिनय क्षेत्रात आले होते. याच कारणामुळे ते आज साधारण आयुष्य जगतात.

सिनेमात येण्यापूर्वी नाना रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग रंगवण्याचे काम करायचे. ते अप्लाइड आर्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. ते एक उत्कृष्ट स्केच आर्टिस्ट आहेत. मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी ते आरोपींचे स्केच बनवण्याचे काम करायचे. शिवाय प्रहार सिनेमातील भूमिकेसाठी नाना यांनी ३ वर्षे लष्काराचे प्रशिक्षणही घेतलं होतं. रुपेरी पडद्यावर तापट किंवा एंग्री मॅन वाटणारा नाना प्रत्यक्ष जीवनात तितकाच हळवा, भावनिक आणि शांत स्वभावाचा व्यक्ती आहे.

टॅग्स :नाना पाटेकर