Join us

"बिजनेसमॅनचा मुलगा बिजनेसमॅन होतो आणि...", नेपोटिझमवर स्पष्टच बोलला किशोरी शहाणेंचा मुलगा बॉबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 18:22 IST

किशोरी शहाणे यांनी त्यांचा लेक बॉबीसह लोकमत फिल्मीच्या सेलिब्रिटी किड्स या शोमध्ये हजेरी लावली होती. 

किशोरी शहाणे या मराठी सिनेसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री आहेत. त्यांनी अभिनयाने एक काळ गाजवला. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. किशोरी शहाने यांचे पती दीपक विज हेदेखील सुप्रसिद्ध निर्माते आहेत. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतच त्यांचा मुलगा बॉबीदेखील मॉडेलिंगमध्ये करिअर करत आहे. किशोरी शहाणे यांनी त्यांचा लेक बॉबीसह लोकमत फिल्मीच्या सेलिब्रिटी किड्स या शोमध्ये हजेरी लावली होती. 

या मुलाखतीत बॉबीने नेपोटिझमवर भाष्य केलं. तो म्हणाला, "मी त्याबद्दल कधी विचारच केला नाही. नेपोटिझम आहे आणि त्याने मला फायदा होईल, असा जर मी विचार केला असता तर मी सुरुवातीपासून लहानपणापासून एवढं सगळं काम केलं नसतं. माझं नेहमी असं होतं की मला स्वत: हे सगळं करायचं आहे. आईबाबा आहेत आणि त्यांचा पाठिंबा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे काही लोकांच्या घरी आईबाबांना माहित नसतं की हे अभिनयाचं क्षेत्र नक्की काय आहे. पण, त्यापेक्षा मला सपोर्ट मिळतोय. आम्हाला माहितीये की तुला या क्षेत्रात काम करायचंय पण हा तुझा वैयक्तिक प्रवास असला पाहिजे. त्यामुळे  मला काही एक्स्ट्रा बेनेफिट नव्हतं".

"मला एक पॉइंट सांगायचा आहे. नेपोटिझम काय असतं? आईबाबांनी काम केलंय. मी सेम क्षेत्रात आहे. हे प्रत्येक क्षेत्रात घडतं. बिजनेसमॅनचा मुलगा बिजनेसमॅन होतो. वकिलाचा मुलगा वकील होतो. हे पालकांचे संस्कार असतात. तुम्ही त्यांना बघून शिकता. त्यांना बघून तुम्हाला प्रेरणा मिळते. असं काही नसतं मला अॅडव्हानटेज मिळालंय आणि मला ते नकोदेखील आहे. हा माझा स्वत:चा प्रवास आहे. आणि मला यात आनंद आहे की माझ्या पालकांचा मला पाठिंबा आहे", असंही तो पुढे म्हणाला. 

टॅग्स :किशोरी शहाणेसेलिब्रिटी