Join us

'आयत्या घरात घरोबा'मधला किर्तीकर बंगला मुंबईत आहे या ठिकाणी, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 17:45 IST

Aaytya Gharat Gharoba Movie : सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) दिग्दर्शित 'आयत्या घरात घरोबा' (Aaytya Gharat Gharoba Movie) हा चित्रपट १९९१ साली रिलीज झाला होता. या सिनेमात दाखवलेला किर्तीकर निवास कुठे आहे, तुम्हाला माहित्येय का? चला तर मग जाणून घेऊयात.

सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) दिग्दर्शित 'आयत्या घरात घरोबा' (Aaytya Gharat Gharoba Movie) हा चित्रपट १९९१ साली रिलीज झाला होता. या चित्रपटात अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी साकारलेली गोपू काकाची भूमिका खूप लोकप्रिय ठरली होती. आजही हा चित्रपट रसिकांच्या मनात घर करून कायम आहे. या सिनेमात अशोक सराफ यांच्यासोबत सुप्रिया पिळगावकर, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, किशोरी शहाणे, राजेश्वरी सचदेव, सुधीर जोशी, जयराम कुलकर्णी हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. या सिनेमात दाखवलेला किर्तीकर निवास कुठे आहे, तुम्हाला माहित्येय का? चला तर मग जाणून घेऊयात.

'आयत्या घरात घरोबा' या चित्रपटाचं जास्त शूटिंग हे एका बंगल्यात झालं होतं. ज्याचं नाव किर्तीकर निवास होतं. हा बंगला मुंबईतच आहे. हा पहिला मराठी सिनेमा होता ज्याचं शूटिंग या बंगल्यात झालं होतं. याबद्दल सुप्रिया आणि सचिन पिळगावकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, "मराठी चित्रपट एकही त्या बंगल्यात शूट झालेला नाही, सगळे हिंदी चित्रपट शूट झाले आहेत. कारण तो महागडा बंगला आहे. तो महागडा जरी असला तरी तो आपल्याला या चित्रपटात असायला पाहीजे.'' 

सिनेमात झळकलेली श्रिया

''जुहूमध्ये तो बंगला आहे. तो बंगला या चित्रपटातील महत्वाचं कॅरॅक्टर होतं. आपण सेट लावू शकत नव्हतो कारण त्यात श्रीमंती दाखवायला लागणार होतं. त्यावेळी श्रियाचा जन्म झाला होता, साधारण १ वर्षांची ती होती तेव्हा तिचं नुकतंच जावळ काढण्यात आलं होतं, या चित्रपटाच्या एका शॉटमध्ये तिला दाखवलं होतं.'', असे त्यांनी सिनेमाची आठवण सांगताना सांगितले होते. 

टॅग्स :अशोक सराफसचिन पिळगांवकरसुप्रिया पिळगांवकरलक्ष्मीकांत बेर्डे