Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बहरला हा मधुमास' पोहोचला सातासमुद्रापार, टांझानियाच्या या भावंडांचा डान्स बघितला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 12:07 IST

महाराष्ट्र शाहीर' मधील 'बहरला मधुमास नवा' हे गाणं सध्या सगळीकडेच गाजतंय.

केदार शिंदे यांचा मराठी सिनेमा 'महाराष्ट्र शाहीर' मधील 'बहरला मधुमास नवा' हे गाणं सध्या सगळीकडेच गाजतंय. सोशल मीडियावर बहुतांश रिल्स या गाण्यावर आहेत. सर्वांनाच या गाण्याची भुरळ पडली आहे. आता तर हे गाणं थेट सातासमुद्रापार पोहोचलंय. दक्षिण आफ्रिकेच्या टांझानियाचे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किली पॉल आणि त्याची बहीण नीमा पॉल यांनीही 'बहरला मधुमास'वर रील केले आहे. त्यांचे हे रिल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय.

टांझानियाचे किली पॉल (Kili Paul) आणि नीमा पॉल (Neema Paul) ही भावंडं नेहमीच भारतीय गाण्यांवर व्हिडिओ करत असतात. त्यातही मराठी गाण्यावर त्यांनी रील केल्याने त्यांनी सर्वांचंच लक्ष वेधलंय. 'हे गाणं आणि हा डान्स, एन्जॉय करा' असं कॅप्शन त्याने दिलं आहे. 

'मस्त डान्स केला नीमा ताई आणि किली भाऊ', 'भाऊ तू मराठी प्रेक्षकांना खूश केल्याबद्दल तुला प्रेमाचा जय महाराष्ट्र' अशा कमेंट्स मराठी लोकांनी केल्या आहेत. किली पॉल आणि नीमा या भावंडांनी नेहमीच आपल्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांचे इन्स्टाग्रामवर ५ मिलियन फॉलोअर्स आहेत. मध्यंतरी किली पॉलला भारतात आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी त्याने माधुरी दिक्षित, नोरा फतेही अशा अनेक सेलिब्रिटींसह डान्सचा आनंद घेतला.

टॅग्स :सोशल व्हायरलअंकुश चौधरीद. आफ्रिकासोशल मीडिया