Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकुलती एक! लाडक्या लेकीसाठी केदार शिंदेंची खास पोस्ट, म्हणाले, "डोकं जमिनीवर आणि पाय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 10:36 IST

लाडक्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदेंनी खास पोस्ट शेअर केली आहे. 

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अनेक सुपरहिट चित्रपट सिनेसृष्टीला दिले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत केदार शिंदेंची लेक सना शिंदेनेही सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटात सनाच्या अभिनयाची झलकही पाहायला मिळाली. चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या सनाचा आज वाढदिवस आहे. लाडक्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदेंनी खास पोस्ट शेअर केली आहे. 

केदार शिंदेंनी इन्स्टाग्रामवर सना शिंदेंचा महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील लूकचा फोटो शेअर केला आहे. एकुलत्या एक लेकीला शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी खास पोस्ट लिहिली आहे. "सना वाढदिवसाच्या शुभेच्छा...मोठी हो. यशस्वी हो. डोकं जमिनीवर आणि पाय जमिनीच्या आत राहू देत. यशात आणि अपयशात एकच लक्षात ठेव..हे दिवसही सरतील. श्री स्वामी कृपा सदैव राहो. तेच सांभाळतील तुला," असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. केदार शिंदेंच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत सनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

सनाने केदार शिंदेंच्या अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका निभावली आहे. 'अगं बाई अरेच्चा' चित्रपटात तिने बालकलाकार म्हणून काम केलं होतं.एप्रिल महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातून सनाने अभिनयात पदार्पण केलं. या चित्रपटात तिने शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती साबळे यांची भूमिका साकारली होती. 

टॅग्स :केदार शिंदेमराठी अभिनेतामराठी चित्रपट