Join us

"बायकांच्या मनातलं कसं ओळखायचं?", केदार शिंदेंनी सांगितली ट्रिक, म्हणाले- "माझी बायको..."

By कोमल खांबे | Updated: April 29, 2025 12:13 IST

बायकांच्या मनातलं ऐकू आलं तर अशी भन्नाट संकल्पना त्यांनी 'अगं बाई अरेच्चा' या सिनेमातून मांडली. 'बाईपण भारी देवा' हा केदार शिंदेंचा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यामुळे खरंच केदार शिंदेंना बायकांच्या मनातलं ओळखतं येतं का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

केदार शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक. नेहमीच वेगळ्या कलाकृतीतून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. बायकांच्या मनातलं ऐकू आलं तर अशी भन्नाट संकल्पना त्यांनी 'अगं बाई अरेच्चा' या सिनेमातून मांडली. 'बाईपण भारी देवा' हा केदार शिंदेंचासिनेमा सुपरहिट ठरला. त्यामुळे खरंच केदार शिंदेंना बायकांच्या मनातलं ओळखतं येतं का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. "बायकांच्या मनातलं कसं ओळखायचं?" यावर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी भन्नाट ट्रिक सांगितली आहे. 

'झापुक झुपूक' या सिनेमाच्या निमित्ताने केदार शिंदेंनी रीलस्टार नीलच्या युट्यूबला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना नीलने "बायकांच्या मनातलं कसं ओळखायचं?", असा प्रश्न विचारला. यावर केदार शिंदेंनी अतिशय मिश्किलपणे हसून उत्तर दिलं. ते म्हणाले, "माझ्या बायकोने फार सुंदर उत्तर दिलं होतं. ती म्हणाली होती की बायकांच्या मनातलं जाऊ दे आधी बायकोच्या मनातलं ओळखा. आपल्याला घरात राहायचंय तर आपल्याला समजून घेतलं पाहिजे".

दरम्यान, केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला 'झापुक झुपूक' सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमातून सूरज चव्हाणने मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली आहे. २५ एप्रिलला 'झापुक झुपूक' सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. मात्र, सिनेमाला म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाहीये. चार दिवसात या सिनेमाने केवळ ७३ कोटींचा गल्ला जमवला आहे. 

टॅग्स :केदार शिंदेसिनेमा