Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कधी तू..' फेम गायकाच्या लेकीने १० वीच्या परीक्षेत मिळवले तब्बल ९५ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 14:58 IST

मुंबई पुणे मुंबई सिनेमातील कधी तू या लोकप्रिय गाण्याच्या गायकाच्या लेकीने दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेत ९५ टक्के मिळवल्याने सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय (hrishikesh ranade)

'मुंबई पुणे मुंबई' सिनेमातील 'कधी तू रिमझीम झरणारी बरसात' हे गाणं सर्वांच्या आवडीचं आहे, यात शंका नाही. आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये हे गाणं असेल. याच गाण्याचा गायक हृषिकेश रानडेच्या आयुष्यात एक आनंदाची बातमी आलीय. हृषिकेशची लेक अनुष्काने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९५ टक्के गुण मिळवले आहेत. त्यानिमित्त हृषिकेशने सोशल मीडियावर मुलीचं अभिनंदन करणारी एक पोस्ट शेअर केलीय. 

हषिकेशने व्हिडीओ शेअर करत लिहिलंय की, "आमची मुलगी अनुष्काने 95.4 टक्के गुण मिळवून 10वी ICSE बोर्डाच्या परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्याचा अत्यंत अभिमान आणि आनंद वाटतो!!!!! अनुष्का यशासाठी खरोखरच पात्र आहे !!!!! आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे अनुष्कासाठी प्राजक्ताने केलेले प्रयत्न आणि देखरेख खूप महत्त्वाची होती!"

हषिकेश पुढे लिहितो, "तसेच अनुष्काच्या सर्व शिक्षकांचे आणि तिच्या मैत्रिणींचे आभार. ज्यांनी तिला मार्गदर्शन केले, तिला खूप संयमाने, प्रेमाने शिकवले आणि तिला या महत्त्वपूर्ण टप्प्यातून नेले! दौऱ्यावर असल्यामुळे हे क्षण जगण्यासाठी मी तिथे नाही.... खूप अभिनंदन आणि प्रिय अनुष्का आणि तिच्या सर्व मित्रांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा." अनेकांनी या पोस्टखाली हृषिकेश आणि त्याच्या लेकीचं अभिनंदन केलंय

टॅग्स :मुंबई पुणे मुंबई 3दहावीसीबीएसई परीक्षा