Join us
Daily Top 2Weekly Top 5

'झिम्मा २' बॉक्स ऑफिसवर करणार कल्ला, प्रदर्शनाआधीच सिनेमाच्या हजारो तिकिटांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 11:00 IST

'झिम्मा २' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाच्या हजारो तिकिटांची विक्री झाली आहे.

बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित 'झिम्मा २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 'झिम्मा'नंतर या सिनेमाच्या सीक्वेलबाबत  प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता दोन वर्षांनी प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. 'झिम्मा २'चा ट्रेलरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या चित्रपटातील गाणीही व्हायरल झाली आहेत. जिकडेतिकडे 'झिम्मा'ची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. 

'झिम्मा २' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाच्या हजारो तिकिटांची विक्री झाली आहे. हेमंत ढोमेने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये 'झिम्मा २' ट्रेण्डमध्ये असल्याचं दिसत आहे. २४ तासात या सिनेमाची ५ हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. याचा व्हिडिओ शेअर करत "आपला पिच्चर ट्रेडींग मारतोय मंडळी… धन्यवाद तुमच्या कमाल रिस्पॅान्स साठी! ज्यांनी अजुन बुक केलं नाही त्यांनी तिकीटं बुक करा…दोन दिवसात भेटूच थेटरात!", असं हेमंत ढोमेने म्हटलं आहे. 

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात क्षिती जोग, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, सुहास जोशी, सायली संजीव, निर्मिती सावंत, सिद्धार्थ चांदेकर, सुचित्रा बांदेकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.  

टॅग्स :मराठी चित्रपटमराठी अभिनेतारिंकू राजगुरूसिद्धार्थ चांदेकर