९०चं दशक गाजवलेले अभिनेते जयवंत वाडकर यांची लेक स्वामिनी लग्नाच्या बेडीत अडकली आहे. मोठ्या थाटामाटात स्वामिनीचा लग्नसोहळा पार पडला. स्वामिनीने बॉयफ्रेंड वरुण नायर याच्यासोबत सप्तपदी घेत तिच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे. तिच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो समोर आले आहेत. स्वामिनीच्या विवाहसोहळ्याला मराठी कलाविश्वातील मंडळींनीही हजेरी लावली होती.
स्वामिनीची मैत्रीण आणि लक्ष्मीकांत-प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डेने तिच्या इन्स्टाग्रामवरुन स्वामिनीच्या लग्नातील काही खास क्षण शेअर केले आहेत. स्वामिनी आणि तिच्या पतीने लग्नासाठी पारंपरिक लूक केला होता. स्वामिनीने साडी नेसून भरजरी दागिन्यांनी शृंगार केला होता. तर तिच्या पतीने साऊथ स्टाइल लुंगी घातली होती. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत स्वामिनी आणि वरुण यांनी सप्तपदी घेत आयुष्यभर एकमेकांना सोबत करण्याचं वचन दिलं.
कोण आहे जयवंत वाडकरांचा जावई?
वरुण हा प्रसिद्ध निर्माता आहे. मिरारी प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेचा तो संस्थापक आहे. वरुणने प्लॅनेट मराठीवरील 'बाबा' या सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमात जयवंत वाडकर आणि स्वामिनी या बाप-लेकीने काम केलं होतं. वरुण हा मल्याळी असून तो स्वामी भक्त आहे. वरुण आणि स्वानंदी रिलेशनशिपमध्ये होते. आता ते लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.
Web Summary : Actress Jaywant Wadkar's daughter, Swamini, married her boyfriend, Varun Nair, in a grand ceremony. Varun, a producer, and Swamini worked together on the film 'Baba.' The wedding was attended by Marathi celebrities.
Web Summary : अभिनेता जयवंत वाडकर की बेटी स्वामिनी ने बॉयफ्रेंड वरुण नायर से धूमधाम से शादी की। वरुण एक निर्माता हैं, और स्वामिनी ने फिल्म 'बाबा' में उनके साथ काम किया था। शादी में मराठी हस्तियां शामिल हुईं।