Join us

'वडिलांना घाबरत नाही, तितकं अशोक पप्पांना...',सायलीनं अशोक सराफांसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 07:00 IST

Sayali Sanjeev : सायली संजीवने तिचे अशोकमामांसोबतचे नाते कसे आहे आणि बरेचशे लोक तिला त्यांची मुलगी का म्हणतात याचा खुलासा केलाय.

अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) ही मराठीतली आघाडीची अभिनेत्री... पण जर तुम्हाला कुणी सांगितलं की सायली ही अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची मुलगी आहे तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? पण अनेकांना हे खरं वाटते. सायली अशोकमामांची मुलगी नसली तरीही सायली आणि अशोकमामांचं नातं खूप खास आहे. नुकतंच लोकमत फिल्मीच्या पंचायत या शोमध्ये सायलीने तिचं अशोकमामांचं नातं कसं आहे आणि बरेचशे लोकं तिला त्यांची मुलगी का म्हणतात याचा खुलासा केलाय.

बाबा फक्त संजीव आहेत. अशोक सराफ सर, स्वतः म्हणाले की तू आता मला काय म्हणशील?. तू आता मला पप्पा म्हण. तर मी त्यांना अशोक पप्पा म्हणते. सेटवर किंवा टेलिव्हिजनवर एकत्र असू तेव्हा मी त्यांना सर म्हणण्याला प्राधान्य देते. कारण ते खूप दिग्गज कलाकार आहेत आणि आपण त्यांना तो मान दिला पाहिजे. 

मला ते काहे दिया परदेस पासून ते बघायला लागले. त्या आधी आमची काही ओळख नव्हती. जेव्हा मालिकेचे प्रोमो रिलीज झाला तेव्हा बरेच जण बोलू लागले की ही निवेदिता सराफ यांची कॉपी आहे. त्या कमेंट्समध्ये निवेदिता सराफ यांची मुलगी आहे का? अशोक सराफ दररोज मालिका न चुकता पाहायचे. त्यांच्या एका चित्रपटाच्या म्युझिक लाँचला मी गेले होते. तेव्हा त्यांनी माझ्या एका मित्राला तिला घेऊन ये असं सांगितलं. तो त्या सिनेमात काम करत होता. तिथे आमची पहिली भेट झाली. तेव्हा पासून मुलीचं आणि बापाचं नातं सुरू झालंं.

माझ्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले आणि चार वर्षांपासून मी अशोक पप्पांना ओळखते. अशोक सर मला मुलगी मानतो. त्यांचा मुलगा अनिकेत याबद्दल त्यांना फारशी माहिती नसते. पण त्यांना माझी प्रत्येक अपडेट माहित असते. ते माझी एकही मुलाखत चुकवत नाहीत. मी जितकी माझ्या वडिलांना घाबरत नव्हते. तितकी अशोक पप्पांना घाबरते,  असे सायलीने सांगितले.

टॅग्स :सायली संजीवअशोक सराफ