अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांना या माध्यमातून अपडेट देत असते. दरम्यान तिने आज तिची दिवंगत बहीणीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
भाग्यश्री मोटेने बहीण मधू मार्कंडेय सोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, माझ्या हृदयाचा एक मोठा तुकडा! माझी बहीण, माझी दुसरी आई! एकाच व्यक्तीमध्ये तुम्हाला जे काही सापडेल ते सर्व! मी दररोज तुझ्यावर प्रेम करते! मला दररोज तुझी आठवण येते! मी आपल्या आठवणींना उजाळा देत असते. मी तुला भेटण्याची आणि पुन्हा मिठी मारण्याची वाट पाहत आहे... तोपर्यंत मी आपल्या जुन्या दिवसांप्रमाणेच तुला अनेक प्रकारे साजरे करेन! वाढदिवसाच्या शुभेच्छा.
बहिणीच्या मुलांचा सांभाळ करतेय अभिनेत्रीभाग्यश्रीची बहीण मधू मार्कंडेय हिचा पुण्यात काही वर्षांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. अद्याप या प्रकरणाचा तपास लागलेला नाही. तिच्या निधनानंतर तिच्या पतीचंही निधन झाले. त्यांना दोन छोटी मुले आहेत. त्यांचा सांभाळ भाग्यश्री करत आहे.
वर्कफ्रंट...मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे अभिनेत्री भाग्यश्री मोटेने कलाविश्वात पदार्पण केले. लवकरच ती एका बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहे. तसेच तिने साऊथमध्येही काम केले आहे.