Join us

“I am on top of the World", कुशल बद्रिकेची नवी पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 13:31 IST

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. आपल्या विनोदीशैलीमुळे प्रेक्षकांचं मन जिंकणारा कुशल त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. आपल्या विनोदीशैलीमुळे प्रेक्षकांचं मन जिंकणारा कुशल त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असतो. कलाविश्वाप्रमाणे कुशल सोशल मीडियावर कमालीचा अ‍ॅक्टीव्ह असून वरचेवर नवनवीन पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. सध्या कुशलची अशीच एक पोस्ट चर्चेत आली आहे.

कुशलने सोशल मीडियावर त्याच्या दोन सिनेमांचे पोस्टर शेअर केले आहेत. आज पासुन माझे दोन सिनेमे सिनेमाघरांमधे झळकतायत” १) भिरकीट २) झोल झाल “I am on top of the World” हा असा एक दिवस माझ्या आयुष्यात आला त्याबद्दल मी देवाचा माझ्या दिग्दर्शकांचा आणि निर्मात्यांचा कायम ऋणी असेन. अशी पोस्ट कुशलने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सोशल मीडियावर त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होतेय. 

भिरकीटला रिलीज ३ आठवडे झालेत तर झोल झाल हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्यांदाच कुशल एका खलनायकाच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. कुशल लवकरच 'झोलझाल' या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारतोय.  मानस कुमार दास दिग्दर्शित हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, अंकुर वाढवे, विश्वजित सोनी, श्याम मसलकर, प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक ही दिग्गज कलाकार मंडळी झळकणार आहेत.

टॅग्स :कुशल बद्रिकेसिनेमा