Join us
Daily Top 2Weekly Top 5

ह्रता दुर्गुळेच्या नवऱ्याने केलं तिचं जाहिरपणे कौतुक, 'अनन्या' चित्रपटाचा ट्रेलर पाहून म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 13:58 IST

अभिनेत्री हृता दुर्गुळेने तिचा प्रियकर प्रतीक शाहसोबत १८ मे रोजी लग्नगाठ बांधली आहे.हृता आणि प्रतीकच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. तिला महाराष्ट्राची क्रशदेखील म्हटले जाते. तिचे फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. अनन्या या तिच्या आगामी सिनेमचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे.एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव निर्मित 'अनन्या' (Ananya) येत्या २२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने प्रतिकने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

अभिनेत्री हृता दुर्गुळेने तिचा प्रियकर प्रतीक शाहसोबत १८ मे रोजी लग्नगाठ बांधली आहे.हृता आणि प्रतीकच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.हृता आणि प्रतीकच्या रोमँटिक फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.प्रतीक हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.

ह्रतासाठी प्रतिकची खास पोस्ट या सिनेमाचा ट्रेलर पाहुन ह्रताचा पती प्रतिक शहाने एक खास पोस्ट शेअर केली आहे. इच्छा, निश्चय, धैर्य, शौर्य आणि एक कथा  सामान्य माणसाच्या ताकदीच्या पलीकडची कथा चित्रपटाची आहे. यात एका सामान्य मुलीची विलक्षण गोष्ट चित्रपटात दाखवण्यात आली आहे. आत्ताच ट्रेलर पाहा अशा शब्दांत प्रतिकने ह्रताचं कौतुक केलं आहे. 

अनन्या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले असून 'अनन्या'ची व्यक्तिरेखा हृता दुर्गुळे साकारत आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया 'अनन्या'चे निर्माते आहेत. आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी धडपडणारी, आयुष्य दिलखुलास जगणारी 'अनन्या' दिसत आहे. एका अपघातात तिचे दोन्ही हात जातात. मात्र 'अनन्या' पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभी राहताना यात दिसत आहे. नावाप्रमाणेच इतरांपेक्षा वेगळ्या असणाऱ्या 'अनन्या'चा एक प्रेरणादायी प्रवास यात दिसत असून 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!' हा खूप मोलाचा सल्ला देणारा हा चित्रपट आहे.

टॅग्स :ऋता दूर्गुळेसिनेमा