Join us

सगळ कसं छान छान! म्हणत प्राजक्ता माळीने भाच्यांसोबत एन्जॉय केली सुट्टी, पहा तिचा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 18:04 IST

चिमुकल्यांसोबत झुल्यावर झोके घेत मस्ती करताना दिसली प्राजक्ता माळी

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. ती बऱ्याचदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती तिच्या दोन भाच्यांसोबत झुल्यावर झोके घेत मस्ती करताना दिसते आहे. तिच्या भाच्यांसोबतच्या फोटो आणि व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे.

प्राजक्ता माळी हिने इंस्टाग्रामवर भाच्यांसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, मेरे दो अनमोल रतन. भाच्या..याज्ञसेनी आणि शिवप्रिया. तिच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. या फोटोत ती झुल्यावर भाच्यांसोबत मस्ती करताना दिसते आहे.

तसेच तिने एक व्हिडीओ शेअर करत म्हटले की, पाऊस, वातावरण, जेवण, भाचरांचा सहवास.. सगळ कसं- छान छान छान छान.. प्राजक्ताने सुट्टीचा दिवस तिच्या भाच्यांसोबत छान व्यतित केला आहे. तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी बऱ्याचदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोशूट शेअर करत असते. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत असते. 

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमध्ये सध्या सूत्रसंचालन करताना दिसते आहे. तसेच तिने डिसेंबर महिन्यात लकडाउनचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाचे शूटिंग जुन्नर येथे पार पडले आहे. संतोष रामदास मांजरेकर हे या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.  

टॅग्स :प्राजक्ता माळीअंकुश चौधरी