Join us

काकू म्हटल्यावर न चिडण्याचं वय आता झालंय..., हेमांगी कवीच्या पोस्टची चर्चा भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 18:09 IST

Hemangi Kavi : मराठी चित्रपटसृष्टीतील बिनधास्त अभिनेत्री हेमांगी कवीची (Hemangi Kavi ) तशी प्रत्येक पोस्ट चर्चेत असते. सध्याही तिची अशीच एक पोस्ट चर्चेत आहे.

ठळक मुद्देहेमांगी कवी  स्वत:चे विचार परखडपणे मांडणारी बेधडक अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. अनेकदा ती यावरून ट्रोलही होते.

मराठी चित्रपटसृष्टीतील बेधडक अन् बिनधास्त अभिनेत्री हेमांगी कवीची (Hemangi Kavi ) तशी प्रत्येक पोस्ट चर्चेत असते. सध्याही तिची अशीच एक पोस्ट चर्चेत आहे. होय, आज वाढदिवसाच्या दिवशी हेमांगीने एक खास पोस्ट शेअर केली आहे आणि खास म्हणजे, ही पोस्ट शेअर करताना ‘गुगल’ला हळूच टोमणाही मारला आहे.तर आज हेमांगीचा वाढदिवस. आज ती 41 वर्षांची झाली. याच पार्श्वभूमीवर तिने एक पोस्ट शेअर केली आहे. काळ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केलेला एक ग्लॅमरस फोटो शेअर करत हेमांगीने स्वत:च स्वत:ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ती लिहिते, ‘मला 41 व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्या! गूगल वर जन्मतारीख बरोबर आहे पण सालाची (जन्माचं वर्ष) नोंद चुकीची आहे याची कृपया मंडळाने नोंद घ्यावी! धन्यवाद! जे 1 ते 20 वयोगटातील आहेत. ते मला आन्टी (काकू) म्हणून बोलवू शकतात. कारण आन्टी म्हटल्यावर न चिडण्याचं वय आता झालंय!’हेमांगी कवी  स्वत:चे विचार परखडपणे मांडणारी बेधडक अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. अनेकदा ती यावरून ट्रोलही होते. काही दिवसांपूर्वी हेमांगी ‘बाई, बूब्स आणि ब्रा’ या पोस्टमुळे चर्चेत होती. यावरून अनेकांनी तिला ट्रोलही केलं होतं.

 हिच्या इतक्या बिनधास्त पोस्ट हिच्या घरचे वाचत नसतील का? असा प्रश्न हेमांगीच्या बिनधास्त पोस्ट वाचून चाहत्यांना नेहमी पडतो. अलीकडे तिनं या प्रश्नालाही उत्तर दिलं होतं. ‘ माझा भाऊ आहे सोशल मीडियावर आणि तो बघतो, वाचतो माझ्या सगळ्या पोस्ट. त्यावर दादाची एकच रिअ‍ॅक्शन असते. गुड ऑर बॅड. मी आहे तुझ्यासोबत, तुझं रक्षण करायला. म्हणूनच मी नाही घाबरत....,’अशा आशयाची पोस्ट तिने रक्षाबंधनाच्या दिवशी शेअर केली होती.

टॅग्स :हेमांगी कवी