Join us
Daily Top 2Weekly Top 5

"त्या विश्वाचा तो आता बादशाह झालाय...", रेणुका शहाणेने शाहरूख खानसोबतचा अनुभव केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 16:25 IST

Renuka Shahane shares her experience with Shah Rukh Khan: रेणुका शहाणेचा नुकताच 'उत्तर' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी तिने शाहरूख खान सोबत काम करताना आलेला अनुभव शेअर केला.

अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. मात्र हम आपके है कौन या सिनेमातून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. नुकताच तिचा 'उत्तर' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने रेणुकाने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी तिने शाहरूख खान सोबत काम करताना आलेला अनुभव शेअर केला. 

रेणुका शहाणे शाहरूख खानबद्दल म्हणाली की, ''तो फारच कॅज्युअल होता. म्हणजे त्याला त्याचं अजिब म्हणजे फौजीचं पण इतकं त्या क्रेझ होती त्याच्याबाबतीत पण तरी असं काही कुठे त्याचं हे नव्हतं की आपण कोणीतरी आहोत असा अजिबात व्यवहार नव्हता त्याचा खूपच असा नॉर्मल होता तो आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये ती ऊर्जा होती. खूप मस्त काम करायची. त्याला खूप म्हणजे असं लोक त्याचं खूप कौतुक करतात. हे त्याला खूप आवडायचं. म्हणजे ते पहिल्यापासूनच होतं की मी काही काम केलं आणि लोकांना ते आवडायला पाहिजे. ही त्याची वृत्ती होती. पण त्याच्यासाठी कसून मेहनत करायला तो तयार होता.'' 

ती पुढे म्हणाली की, ''तिथे कधीच त्याने मागे पुढे नाही पाहिलं. आणि त्या काळात थिएटर किंवा  मालिकेमध्ये तो खूप खूश होता. कधीच असा तो म्हणायचा नाही की चित्रपटांकडे मला वळायचंय किंवा मला मोठं स्टार व्हायचंय चित्रपटांचा वगैरे. पण त्याच्या ज्या आई आहेत त्यांना खूप वाटायचं की याने चित्रपटांमध्ये पण काम करावे वगैरे म्हणजे त्यांचं स्वप्न मला वाटतं त्यांनी पूर्ण केलं चित्रपटांमध्ये येऊन. मला आठवतं दिल आशना है त्याने साइन केलं होतं तेव्हा माझ्या एका शूटिंगच्या सेटवर तो आला होता. विवेक वासवानी बरोबर आला होता आणि तेव्हा तो म्हणाला की अरे ते विश्व काहीतरी वेगळंच आहे. आता मला असं वाटतं की त्या विश्वाचा तो आता बादशाह झालाय.'' 

English
हिंदी सारांश
Web Title : Renuka Shahane Shares Her Experience Working with Shah Rukh Khan

Web Summary : Renuka Shahane shared her experience working with Shah Rukh Khan, noting his casual nature, immense energy, and dedication to his craft. She recalled his initial contentment with theatre and television, and his eventual rise to superstardom in films, fulfilling his mother's dream.
टॅग्स :रेणुका शहाणेशाहरुख खान