Join us
Daily Top 2Weekly Top 5

"हॅप्पी बर्थडे पप्पा...", अशोक सराफ यांना लाडकी लेक सायली संजीवने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:12 IST

Ashok Saraf : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आणि सर्वांचे लाडके अशोक मामा उर्फ अशोक सराफ आज ७८वा वाढदिवस साजरा करत आहेत.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आणि सर्वांचे लाडके अशोक मामा उर्फ अशोक सराफ (Ashok Saraf) आज ७८वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी बॉलिवूडमध्ये भलेही कमी काम केले असेल पण त्यांनी त्यातील भूमिकांतून रसिकांच्या मनात घर केले आहे. अशोक मामांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. दरम्यान त्यांची लाडकी लेक सायली संजीव हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

निवेदिता आणि अशोक सराफ यांनी सायली संजीवला आपली मुलगी मानलं आहे. तीदेखील त्या दोघांना मम्मी पप्पा म्हणते. अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त सायलीने सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले की, हॅप्पी बर्थडे पप्पा. तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ सायलीला आपली लेकच मानतात. त्यांना मुलगी नाही. तसेच सायली अगदी निवेदिता यांच्यासारखीच दिसते असे अनेक लोकांना वाटते. त्यामुळे त्यांनी सायलीला आपली लेकच मानली आहे. बऱ्याचदा अशोक सराफ यांनी सायलीचा उल्लेख माझी लेक असा केलाय. 

वर्कफ्रंटसायली संजीव लवकरच समसारा सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत आहे. काहे दिया परदेस या मालिकेनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तर अभिनेते अशोक सराफ सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मा.मा. मालिकेत काम करताना दिसत आहेत.

टॅग्स :अशोक सराफसायली संजीवनिवेदिता सराफ