Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा अंतरंग उलगडणारं हृदयस्पर्शी गाणं, 'गुलाबी' सिनेमातील 'फिरुनी नवी जन्मेन मी' गाण्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 09:34 IST

बहुचर्चित गुलाबी सिनेमातील फिरुनी नवी जन्मेन मी गाणं रिलीज झालं असून सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे (gulabi)

‘गुलाबी’ चित्रपटाची सध्या उत्सुकता शिगेला आहे. हा चित्रपट मराठीतील मोस्ट अवेटेड सिनेमा म्हणून ओळखला जातोय. चित्रपटात तीन महिलांची प्रेरणादायी गोष्ट पाहायला मिळतेय. या चित्रपटातील आणखी एक प्रेरणादायी गाणं ‘फिरुनी नव्याने जन्मेन मी’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. महिलांच्या स्वत्वाचा शोध आणि आयुष्याकडे पाहाण्याच्या नवीन दृष्टिकोनाबद्दल हे गाणं आहे. महिलांनी आपल्या जीवनात केलेल्या अनेक तडजोडी, त्यातून हरवलेलं अस्तित्व, आणि शेवटी स्वतःसाठी उभं राहाण्याची ताकद या गाण्यातून मांडली गेली आहे.

फिरुनी नवी जन्मेन मी सिनेमाविषयी

अदिती द्रविड यांचे गीत असलेल्या या गाण्याला साई-पियुष यांच्या संगीताने सजवलं आहे, तसेच आर्या आंबेकरचा सुमधुर आवाज या गाण्याला लाभला आहे. हे गाणं प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात स्वतःला शोधण्याची प्रेरणा देणारं आहे. या गाण्यातून स्त्रियांच्या जीवनातील संघर्ष आणि नव्या सुरुवातीचा एक सुंदर प्रवास उलगडतो.चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, ‘‘स्त्री ही कायमच दुसऱ्यांसाठी जगत आलेली आहे. कधी कधी ती स्वतःला इतकं विसरते की स्वतःचा शोध घेण्याची वेळ येते. ‘फिरुनी नव्याने जन्मेन मी’ हे गाणं अशा प्रत्येक स्त्रीला स्वतःसाठी काही करण्याची प्रेरणा देणारं आहे.”

कधी रिलीज होतोय गुलाबी?

व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘गुलाबी’ चित्रपटाचे निर्माते सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे आहेत. तर अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटात अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी, आणि श्रृती मराठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २२ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सर्वांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे.

टॅग्स :श्रुती मराठेमृणाल कुलकर्णीअश्विनी भावे