Join us

रंजनासोबत असलेल्या 'या' चिमुकल्याला ओळखलं का? 'अशी ही बनवाबनवी' मध्ये केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 19:00 IST

Marathi actor: सध्या सोशल मीडियावर 'चानी' या सिनेमातील एक फोटो व्हायरल होत आहे.

मराठी कलाविश्वात आज असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात बालवयातच केली. त्यामुळे आज अनेक बालकलाकार गाजलेल्या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसून येतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अभिनेत्याचा फोटो व्हायरल होत आहे. या अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं. इतकंच नाही तर अशी ही बनवाबनवी सिनेमातही त्याने काम केलं होतं.

सध्या सोशल मीडियावर 'चानी' या सिनेमातील एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये  अभिनेत्री रंजना देशमुखसह एक लहान मुलगा दिसून येत आहे. हा मुलगा बालकलाकार असण्यासोबतच रंजनाचा भाचादेखील आहे. विशेष म्हणजे अनेक जण त्याला ओळखण्यास अपयशी ठरले.

रंजनासोबत दिसणारा हा बालकलाकार साधासुधा नसून अभिनेता सिद्धार्थ रे आहे. सिद्धार्थने अशी ही बनवाबनवी या सिनेमात शंतनू ही भूमिका साकारली होती. तसंच तो रंजनाचा भाचादेखील आहे.  

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटी