Join us

विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 13:40 IST

विधिमंडळातील हाणामारी प्रकरणात आता गोपीचंद पडळकरांच्या गाण्यानं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलंय.

Gopichand Padalkar Viral Video: भाजपा आमदार  गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून शाब्दिक खटके उडत होते. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांचा 'मंगळसूत्र चोर' असा उल्लेख केला आहे.  त्याची परिणिती काल (१७ जुलै) त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीत झालेली पाहायला मिळाली. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. विधानभवनाच्या पायऱ्यावर हा प्रकार घडला.  सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू असतानाच गोपीचंद पडळकर यांचं एक गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

गोपीचंद पडळकर यांचं एक गाणं पुन्हा ट्रेडिंगवर आलंय. हे गाणं सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि गायिका श्रेया घोषाल यांनी गोपिचंद पडळकरांसाठी गायलं होतं. गोपीचंद पडळकर यांच्या गाण्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. खरं तर हे गाणं सहा वर्षांपूर्वीचं आहे. "मन भरून आलं" असं या गाण्याचं शीर्षक आहे. या गाण्यात गोपीचंद पडळकर यांनी जबराटसडान्स केलेला आहे. यात ते साक्षी चौधरीसोबत थिरकलेत. या गाण्याचा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पक्षाचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. सध्या ते जत मतदारसंघातून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले आमदार आहेत. पडळकर हे केवळ राजकारणीच नाहीत, तर चित्रपट निर्माते आणि अभिनेतेही आहेत. २०१९ मध्ये त्यांनी 'धुमस' या चित्रपटाची निर्मिती केली, ज्यात त्यांनी स्वतः अभिनयही केला.

मंगळसूत्र चोर आरोप का?

गोपिचंद पडळकरांवर 'मंगळसूत्र चोर' हा आरोप का झाला यामागे एक जुना वाद आहे. त्यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान गटातटाच्या भांडणातून हा आरोप समोर आला. एका लग्न समारंभात पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते यांची विरोधी गटाशी धक्काबुक्की झाली. यात काही महिलांना धक्के लागले आणि त्याचवेळी मंगळसूत्र चोरीचा आरोप पडळकरांवर लावण्यात आला.  हा आरोप राजकीय हेतूने लावल्याचं सांगितलं जातं.

टॅग्स :गोपीचंद पडळकर