Join us
Daily Top 2Weekly Top 5

गिरीजा ओकने शेअर केला ग्लॅमरस फोटो, फॅन्स म्हणाले स्टनिंग, ब्युटिफूल, गॉर्जिअस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 12:17 IST

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा गिरीजाने आपल्या अभिनयाची मोहिनी दोन्हीकडे घातली आहे. 

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा गिरीजाने आपल्या अभिनयाची मोहिनी दोन्हीकडे घातली आहे. अभिनेत्री गिरीजा ओक- गोडबोलेने माळी हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. गिरीजा सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असते. नुकताच गिरीजाने वेस्टर्न आऊटफिट मधला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या फोटोवर गिरीजाचे फॅन्स आणि रसिकांकडून लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.  या फोटोतील फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. 

ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांची गिरीजा मुलगी असून वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून गिरीजा अभिनय क्षेत्रात आली.  जाहिराती, मालिका, सिनेमा, नाटक यानंतर गिरीजा शॉर्टफिल्मच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला आली होती.

सोशल मीडियाच्या युगात तर कलाकारांपुढची आव्हानं आणखी वाढली आहेत. त्यामुळेच कोणत्याही माध्यमात भूमिका साकारत आव्हान पेलण्याची कलाकारांची तयारी असते. असंच आव्हान गिरीजाने पेलले होते. ‘क्वॉर्टर’ या शॉर्टफिल्ममध्ये ती झळकली होती.

यात गिरीजाचा वेगळा लूक रसिकांना पाहायला मिळाला. आजवर विविध माध्यमांतून वेगवगेळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्यास मिळाल्या असल्या तरी ‘क्वॉर्टर’मधली भूमिका अभिनेत्री म्हणून समाधान देणारी असल्याचेही गिरीजाला सांगितले होते.  

टॅग्स :गिरिजा ओकगिरिश ओक