Girija Oak Trauma : दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचे चित्रपट आजही पाहिले की ते आपल्याला खळखळून हसवतात. सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या त्रिकूटाने मराठी चित्रपटसृष्टीला एक सुवर्णकाळ दाखवला आहे. या तिघांचा असाच एक अजरामर सिनेमा म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. सचिन पिळगावकर दिग्दर्शित हा सिनेमा मराठीतील क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. हा सिनेमा आजही तितक्याच आवडीने पाहिला जातो. पण, याच चित्रपटातील एका खास गाण्याचा 'नॅशनल क्रश' गिरिजा ओक हिला ट्रॉमा आहे.
गिरिजा ओकने 'इसापनिती'ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या 'दोन स्पेशल' या नाटकाच्या एका प्रयोगातील अनुभव सांगितला. ज्यामुळे तिला सचिन पिळगावकरांच्या चित्रपटातील एखा खास गाण्याचा ट्रॉमा निर्माण झाला. ते गाणं ऐकल्यानंतर तिला आजही धडधडायला होतं. गिरिजानं सांगितलं की, ती 'दोन स्पेशल' या नाटकाचे प्रयोग करत होती. या नाटकातील एका भागात तिच्या बहिणीवर अतिप्रसंग झालेला असतो आणि त्या दुःखात तिची बहीण आत्महत्या करते.
पुढे तिनं सांगितलं की, अत्यंत भावनिक आणि संवेदनशील सीन रंगमंचावर सुरू होता. ती पूर्णपणे त्या पात्रात शिरली होती आणि तिला रडू कोसळणार इतक्यात तिने स्वतःला सावरण्यासाठी एक 'पॉज' घेतला. पण, तो भावनिक सीन करत असताना दुसऱ्या रांगेत बसलेल्या एका प्रेक्षकाचा फोन वाजला. त्या फोनची रिंगटोन होती... 'हृदयी वसंत फुलताना'. एका बाजूला ती प्रचंड वेदनेत होते, डोळ्यांत अश्रू होते आणि समोर मात्र हे अत्यंत आनंदी आणि रोमँटिक गाणं वाजत होतं.
गिरीजाने सांगितले की, त्या गंभीर प्रसंगी वाजलेल्या त्या गाण्यामुळे तिच्या मनावर असा काही परिणाम झाला की तिला आता त्या गाण्याची प्रचंड भीती वाटते. गिरिजा म्हणाली, "मी माझ्या भावना कंट्रोल करत होते, पण त्या गाण्याने सगळं विस्कळीत केलं. तेव्हापासून मला त्या गाण्याचा 'ट्रॉमा' बसला आहे. मी त्यानंतर ते गाणं कधीच ऐकलं नाही आणि आजही ते ऐकलं की मला धडधडायला होतं", अशी कबुली तिने दिली.
Web Summary : Girija Oak revealed she experienced trauma from Sachin Pilgaonkar's song "Hridayi Vasant Phultana" after a phone rang during an emotional scene in her play, creating a lasting negative association.
Web Summary : गिरिजा ओक ने बताया कि उन्हें सचिन पिलगांवकर के गाने "हृदयी वसंत फुलताना" से ट्रॉमा हुआ, क्योंकि उनके नाटक के एक भावनात्मक दृश्य के दौरान एक फोन बजने से एक स्थायी नकारात्मक जुड़ाव बन गया।