नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून अनेक स्त्रिया वटपौर्णिमा साजरी करतात. या दिवशी त्या वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारतात आणि व्रत करतात. महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणजेच रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh). या लाडक्या कपलवर नेहमीच प्रेमाचा वर्षाव होतो. जिनिलियानेही आज वटपौर्णिमा साजरी केली. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
जिनिलिया देशमुख घरातच आणलेल्या वडाच्या रोपट्याची पूजा केली. देवघरासमोरच ही पूजा मांडली होती. जिनिलियाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता ज्यात ती सुंदर दिसत होती. 'प्रिय नवरा...आय लव्ह यू, बस... वटपौर्णिमा' असं तिने व्हिडिओ शेअर करत लिहिले.
जिनिलिया देशमुख कुटुंबात अगदी आनंदाने सर्व सण, रुढी परंपरा पाळताना दिसते. म्हणूनच तिला महाराष्ट्राची लाडकी वहिनीही म्हटलं जातं. रितेश आणि जिनिलियाच्या लग्नाला १३ वर्ष झाली आहेत. त्याआधी ते १० वर्ष एकमेकांना डेट करत होते. सर्वांसाठी दोघंही आदर्श कपल आहे. त्यांना राहील आणि रियान ही दोन मुलं आहेत.
वर्कफ्रंटजिनिलिया आगामी 'सितारे जमीन पर' सिनेमात दिसणार आहे. आमिर खानसोबत तिची जोडी जमली आहे. त्यांची केमिस्ट्रीवर प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. तर दुसरीकडे रितेश देशमुख नुकताच 'हाऊसफुल ५' सिनेमात दिसला. सध्या तो 'राजा शिवाजी' सिनेमाच्या शूटमध्ये व्यग्र आहे. जिनिलिया सिनेमाची निर्मिती करत आहे.