Join us
Daily Top 2Weekly Top 5

'फालतू शिकवण देऊ नका...', गौतमी पाटीलचा नवा व्हिडीओ चर्चेत, पुन्हा झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 15:12 IST

फक्त सोशल मीडियावर नाही तर ज्या कार्यक्रमात ती जाते, तिथे तिला पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करताना दिसतात.

'सबसे कातील गौतमी पाटील' म्हणत महाराष्ट्रातल्या तरुणाईने लावणी डान्सर गौतमी पाटीलला अक्षरक्षः डोक्यावर घेतलं आहे. गौतमी पाटील हे नाव जरी नुसतं ऐकलं तरी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. फक्त सोशल मीडियावर नाही तर ज्या कार्यक्रमात ती जाते, तिथे तिला पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करताना दिसतात. तिची एक अदा पाहण्यासाठी लाखोंची गर्दी होते.  नुकतेच गौतमी पुन्हा चर्चत आली आहे. यावेळी नेटकऱ्यांनी तिचं कौतुक नाही, तर तिला ट्रोल केलं आहे. 

सोशल मीडियावर गौतमीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यावरुन नेटकरी संतापले. गौतमीने स्वतः हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. व्हिडीओसोबत तिनं हात जोडण्याचं इमोजी आणि 'सरकार तुम्ही केले मार्केट जाम' असं कॅप्शन दिलं. समोर आलेल्या व्हिडीओत  गौतमीसोबत डान्स करण्यासाठी काही मुली स्टेजवर जातात. यावेळी या मुलीही गौतमीसोबत डान्स करतात. अनेकांना गौतमीचं असे मुलींसोबत डान्स करणे पटलेलं नाही. नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. 

'लहान मुलींना पण शाळा अभ्यास सोडून द्यायला लाव', ‌‌‍‍'फालतू शिकवण देऊ नका', 'सरकार तुम्ही समाजाला वेगळी दिशा देताय', अशा कमेंट करत राग व्यक्त केला.  तर काहींनी 'या मुलींच्या पालकांना जोड्याने हाणला पाहिजे आस कुणाकुणाला वाटतं?', 'आदर्श कोणाचा घ्यावा हे अगोदर आई-वडिलांना शिकवावे लागेल',  अशा कमेंट करत मुलींच्या पालकावरही टीका केली. 

टॅग्स :गौतमी पाटीलसेलिब्रिटीमराठी गाणीसोशल व्हायरल