Join us

अभिनेत्रीने घरीच घडवली मातीपासून गणरायाची क्यूट मूर्ती, म्हणते- "मूर्ती बनवताना दडपण येतं पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 17:42 IST

नेक कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान होतात. तर अनेक कलाकार दरवर्षी स्वत:च्या हाताने गणरायाची मूर्ती बनवतात. अभिनेत्री सायली पाटीलदेखील दरवर्षी स्वत:च्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती घडवते. 

सगळ्यांचा लाडका असलेला गणेशोत्सव आता अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करतात. अनेक कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान होतात. तर अनेक कलाकार दरवर्षी स्वत:च्या हाताने गणरायाची मूर्ती बनवतात. अभिनेत्री सायली पाटीलदेखील दरवर्षी स्वत:च्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती घडवते. 

यंदाही सायलीने तिच्या हाताने मातीपासून बाप्पाची छानशी मूर्ती घडवली आहे. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये सायली मातीपासून गणरायाची गोड मूर्ती बनवताना दिसत आहे. मातीतून तिने बाल गणेश साकारले आहेत. "आमचा बाल गणेश.. फारसा अनुभव नसल्याने मूर्ती घडवताना खूप दडपण येतं. खास करून डोळे बनवताना, पण काय माहीत का…दरवेळी बाप्पाची मूर्ती घडवताना काहीतरी वेगळाच अनुभव येतो", असं सायलीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

पुढे ती म्हणते, "माझ्या हातून मूर्ती घडत असते, पण आकार तो स्वतः घेत असतो. जणू बाप्पाच स्वतःला आपल्या हातांनी आकार देतोय अशी जाणीव होते. हा अनुभव शब्दांत मांडता येणार नाही.  बाप्पा, तू असाच सगळ्यांच्या जीवनात आनंद, प्रेम आणि समाधान भरत रहा. गणपती बाप्पा मोरया!". सायलीच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. 

टॅग्स :गणेशोत्सवसेलिब्रिटी गणेश