मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. नुकतेच तिने एअर इंडिया या भारतीय विमान कंपनीसोबतचा आपला एक खास अनुभव इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांशी शेअर केला आहे. पहाटेची गर्दी आणि तब्येत ठीक नसतानाही विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे अमृता भारावून गेली आहे.
अमृता खाविलकरनने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, "उंच भरारी, पण पाय जमिनीवर! आज आपल्या भारतीय विमान कंपनीसोबत (एअर इंडिया) मला अतिशय सुखद अनुभव आला. पहाटेची प्रचंड गर्दी आणि गजबजलेले विमानतळ असूनही तिथल्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत तत्परता दाखवली. मला खूप ताप आला होता आणि प्रकृती ठीक नसतानाही कामासाठी प्रवास करणे भाग होते."
अमृता भारावली
कर्मचाऱ्यांची माणुसकी आणि टीमवर्क आजारी असलेल्या अमृताला पाहून विमानतळावरील कर्मचारी मदतीसाठी पुढे सरसावले. तिने पुढे नमूद केले की, "एका दयाळू कर्मचाऱ्याने पुढाकार घेत आम्हाला चेक-इन काउंटरवर मदत केली. सुरक्षा तपासणीच्या रांगेतून केवळ १५-२० मिनिटांत बाहेर काढले आणि इतकेच नव्हे तर वैद्यकीय मदतीची विचारणाही केली. कर्मचाऱ्यांमधील शांत आणि संयमी टीमवर्क पाहणे खरोखरच कौतुकास्पद होते."
अमृता पुढे म्हणाली की, प्रवास अत्यंत सुखकर झाला. औषध घेऊन ती संपूर्ण प्रवासात झोपली होती आणि सुखरूप आपल्या स्थळी पोहोचली. "कधीकधी माणुसकीच्या या छोट्या कृतीच तुम्हाला कठीण दिवस पार पाडण्यासाठी बळ देतात," अशा शब्दांत तिने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. अमृताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, विमानतळ कर्मचाऱ्यांच्या या संवेदनशील वागणुकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वर्कफ्रंटअमृता खानविलकरच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर, ती लग्न पंचमी या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करते आहे. यात तिच्यासोबत अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती तस्करी या हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. यात ती इमरान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
Web Summary : Actress Amruta Khanvilkar, feeling unwell, received exceptional assistance from Air India staff at the airport. Overwhelmed by their kindness and efficiency, she shared her positive experience, praising their teamwork and support during her difficult travel. She is grateful for their help.
Web Summary : बीमार महसूस कर रही अभिनेत्री अमृता खानविलकर को हवाई अड्डे पर एयर इंडिया के कर्मचारियों से असाधारण सहायता मिली। उनकी दयालुता और दक्षता से अभिभूत होकर, उन्होंने अपने सकारात्मक अनुभव को साझा किया और उनकी टीम वर्क और कठिन यात्रा के दौरान उनके समर्थन की सराहना की।