Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिंकू राजगुरूने पहिल्यांदाच केली ही गोष्ट, ज्याची सोशल मीडियावर होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 18:51 IST

अभिनेत्री रिंकू राजगुरू कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी आगामी प्रोजेक्टमुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर पोस्टमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याची चर्चा होताना दिसते आहे. 

रिंकू राजगुरूने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करत लिहिले की, पहिले फोटोशूट. तिच्या या फोटोशूटला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.रिंकू राजगुरू सतत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. मात्र तिने पहिल्यांदाच प्रोफेशनल फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिने चेक्सचे जॅकेट, पांढऱ्या रंगाचे टीशर्ट आणि डेनिम घातलेली दिसते आहे. हातात चेक्सची बॅग दिसते आहे. यात रिंकू राजगुरू खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर हंड्रेड वेबसीरिजनंतर आता हिंदीत टू हंड्रेड ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा टीझर तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तिच्यासोबत अमोल पालेकर, वरूण सोबती हे कलाकार दिसणार आहेत.

याशिवाय ती मराठी चित्रपट छूमंतरमध्येही दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये पार पडले. यात रिंकूशिवाय प्रार्थना बेहरे, ऋषी सक्सेना आणि सुव्रत जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रिंकू आणि आकाश ठोसर एकत्र पहायला मिळणार असल्याचे समजते आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूआकाश ठोसरअमिताभ बच्चनअमोल पालेकर