Join us

'KBC'चे पहिले विजेता आहेत 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे पती; जाणून घ्या त्यांच्याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 18:00 IST

Harshvardhan nawathe: KBC च्या पहिल्या पर्वात हर्षवर्धन नवाथे हा महाराष्ट्रीयन तरुण विजयी ठरला होता. विशेष म्हणजे अवघ्या 23 मिनिटांत 15 प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन हर्षवर्धन रातोरात कोट्यधीश झाले होते.

सर्व सामान्यांना कोट्याधीश होण्याचं स्वप्न दाखवणारा रिअॅलिटी शो म्हणजे कौन बनेगा करोडपती. आतापर्यंत या शोचे अनेक पर्व पार पडले असून प्रत्येक पर्वात या शोला त्यांचा कोट्याधीश मिळाला आहे. विशेष म्हणजे या शोच्या पहिल्या पर्वात विजयी झालेला स्पर्धक मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीचा पती आहे हे फार मोजक्या जणांना माहित आहे. त्यामुळे हा कोट्याशीध झालेला स्पर्धक कोण आणि त्याची अभिनेत्री पत्नी कोण याविषयी जाणून घेऊयात. 

KBC च्या पहिल्या पर्वात हर्षवर्धन नवाथे हा महाराष्ट्रीयन तरुण विजयी ठरला होता. विशेष म्हणजे अवघ्या 23 मिनिटांत 15 प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन हर्षवर्धन रातोरात कोट्यधीश झाले होते. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. हर्षवर्धन यांना प्रशासकीय सेवेत जायचं होतं त्यामुळे ते त्या दृष्टीनेच अभ्यास करत होते. त्यांची हीच मेहनत केबीसीमधून दिसून आली. विशेष म्हणजे हर्षवर्धन यांची पत्नी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळेच ही अभिनेत्री कोण ते पाहुयात.

हर्षवर्धन यांनी २००७ मध्ये अभिनेत्री सारिका नीलत्करसोबत लग्न केलं. सारिका आज सारिका नावथे या नावाने ओळखली जाते. तिने अनेक गाजलेल्या हिंदी, मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.  केवळ मालिकाच नव्हे तर तिने चित्रपट, नाटकांमध्येही काम केलं आहे.

दरम्यान, सारिका आणि हर्षवर्धन यांचं अरेंज मॅरेंज आहे. या दोघांना सारांश आणि रेयांश ही दोन मुलंदेखील आहेत. सारिकाने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं असून अजिंक्य ,पहिली शेर दुसरी सवाशेर नवरा पावशेर , एक डाव संसाराचा या चित्रपटांमधील तिच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत. तसंच सध्या सारिका ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत बाबी आत्या ही भूमिका साकारत आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनअमिताभ बच्चन