Join us

प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...

By कोमल खांबे | Updated: June 12, 2025 11:15 IST

सेलिब्रिटींनाही 'मदनमंजिरी'वर ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही. आता परदेशियांनाही प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'ची भुरळ पडली आहे. 

प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमातील गाणीही लोकप्रिय ठरली. फुलवंतीमधील 'मदनमंजिरी' हे लावणी साँग हिट झालं. अनेकांनी प्राजक्ताच्या या गाण्याच्या हुक स्टेप करत रील्स बनवले. काही सेलिब्रिटींनाही 'मदनमंजिरी'वर ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही. आता परदेशियांनाही प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'ची भुरळ पडली आहे. 

युरोपातील बेल्जियम शहरातील नागरिकांनी 'मदनमंजिरी'वर ठेका धरला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओत परदेशी महिलांसह पुरुषही 'मदनमंजिरी'वर डान्स करताना दिसत आहे. हे परदेशी नागरिक हुबेहुब प्राजक्तासारख्या हुक स्टेप्स करताना दिसत आहेत. परदेशी नागरिकांचा 'मदनमंजिरी'वरील डान्स पाहून प्राजक्ताही थक्क झाली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर केला आहे."युरोपात मदनमंजिरी", असं तिने स्टोरीमध्ये म्हटलं आहे. 

गेल्या वर्षी प्राजक्ताचा 'मदनमंजिरी' सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमात प्राजक्ताने मुख्य भूमिका साकारण्यासोबतच निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं होतं. तर स्नेहल तरडेंनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी, स्नेहल तरडे, क्षितिश दाते, सुखदा खांडकेकर, दीप्ती लेले अशी सिनेमाची स्टारकास्ट होती. 

टॅग्स :प्राजक्ता माळीसेलिब्रिटीसिनेमा