Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिंकू राजगुरूचा 'मखना...' गाण्यावरील डान्स पाहिलात का?, व्हिडीओ पाहून तुम्हीही लागाल थिरकू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 15:16 IST

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती मखना या गाण्यावर थिरकताना दिसते आहे.

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच रिंकू राजगुरूने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती मखना या गाण्यावर थिरकताना दिसते आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आता जिथे असाल तिथे फक्त एन्जॉय करा. रिंकू राजगुरूने शूटिंगदरम्याने मोकळा वेळ मिळाला तेव्हा तिने हा डान्सचा व्हिडिओ शूट केला आहे. 

रिंकू राजगुरू सध्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित या प्रोजेक्टमध्ये रिंकूसोबत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर दिसणार आहेत. तिच्या या प्रोजेक्टच्या शीर्षक आणि कथानकाबद्दल अद्याप काही समजू शकलेले नाही. मात्र शूटिंगच्या सेटवरून हा कोर्ट रुम ड्रामा असेल.

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.

प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. तसेच रिंकू झुंड हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

टॅग्स :रिंकू राजगुरूअमोल पालेकरप्रार्थना बेहरे