Join us

इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'एक होतं पाणी'ने मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 13:27 IST

हैदराबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तिसऱ्या इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'एक होतं पाणी' या मराठी सिनेमाने विशेष लक्षवेधी परीक्षक पसंती पुरस्कार प्राप्त करत उतुंग बाजी मारली आहे.

हैदराबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तिसऱ्या इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'एक होतं पाणी' या मराठी सिनेमाने विशेष लक्षवेधी परीक्षक पसंती पुरस्कार प्राप्त करत उतुंग बाजी मारली आहे.

व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज आणि न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज यांची निर्मिती असलेल्या 'एक होतं पाणी' या चित्रपटाचे चित्रीकरण अहमदनगर जिल्ह्यातील डोंगरगण, वांबोरी, ब्राम्हणी, टाकळीमिया व राहुरी येथे झाले आहे. डॉ.प्रविण भुजबळ व विजय तिवारी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहन सातघरे यांचे असून योगेश अंधारे यांनी छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडली आहे .एक होता राजा,एक होती राणी... उद्या म्हणू नका,एक होतं पाणी अशी हटके टॅगलाईन असलेल्या या चित्रपटातून पाण्याची वास्तव दाहकता मांडण्यात आलेली आहे. या सिनेमाचे लेखन आशिष निनगुरकर यांचे आहे. या चित्रपटात अनंत जोग, हंसराज जगताप, श्रीया मस्तेकर, चैत्रा भुजबळ, गणेश मयेकर, यतीन कारेकर, रणजित जोग, जयराज नायर, दिपज्योती नाईक, त्रिशा पाटील, आशिष निनगुरकर, उपेंद्र दाते, आनंद वाघ, रणजित कांबळे, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, डॉ.राजू पाटोदकर व राधाकृष्ण कराळे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील गाणी गीते आशिष निनगुरकर यांनी लिहिली असून संगीतकार म्हणून विकास जोशी यांनी काम केले आहे. ऋषिकेश रानडे,आनंदी जोशी,रोहित राऊत व विकास जोशी यांनी या गाण्यांना आवाज दिला आहे. प्रतिश सोनवणे,सुनील जाधव व स्वप्नील निंबाळकर यांनी निर्मिती व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे.

      आतापर्यंत या सिनेमाला अंबरनाथ फिल्म फेस्टिव्हल, नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल व अहमदनगर फिल्म फेस्टिव्हल येथे गौरविण्यात आले आहे.त्यातच हैदराबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तिसऱ्या इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला विशेष लक्षवेधी परीक्षक पसंती पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र या सिनेमाचे कौतुक होत आहे. लवकरच हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :एक होतं पाणी