'दशावतार' सिनेमा गेल्या आठवड्यात रिलीज झाला. १२ सप्टेंबरला सिनेमा जगभरातील थिएटरमध्ये रिलीज झाला. या सिनेमाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. माऊथ पब्लिसिटिच्या जोरावर 'दशावतार' सिनेमा हाऊसफुल्ल गर्दीत सुरु झाला. सिनेमा रिलीज होऊन सात दिवस झाले आहेत. सात दिवसात सिनेमाने मोठी कमाई केलीय. त्यामुळे मराठी सिनेमाची ताकद संपूर्ण जगाला कळाली आहे. 'दशावतार' सिनेमाची बॉक्स ऑफिस कमाई
'दशावतार' सिनेमाच्या टीमने सोशल मीडियावर सिनेमाच्या सात दिवसांचा कमाईचा आकडा शेअर केला आहे. 'दशावतार' सिनेमाने सात दिवसात तब्बल १०.८० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे 'दशावतार'ची टीम नक्कीच आनंदात असेल यात शंका नाही. काहीच दिवसांपूर्वी अमेरिका, न्यूयॉर्कमधील काही थिएटरमध्ये 'दशावतार' सिनेमा रिलीज झाला आहे. जगभरात 'दशावतार' जी कमाई करेल, त्यानुसार पुढील काही दिवसात या सिनेमाची कमाई आणखी वाढेल यात शंका नाही. दरम्यान 'दशावतार' सिनेमाचा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी पाहिला आहे.