Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुडन्यूज! 'छावा' फेम अभिनेता झाला बाबा; हनुमान जयंतीच्या दिवशी घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 16:52 IST

'छावा' सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा, मुलगा झाल्याने आनंदाला उधाण

Actor Ashish Pathode: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा या सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे आशिष पाथोडे.  या सिनेमात त्याने अंताजींची भूमिका साकारली होती.   त्याच्या या सिनेमातील कामाचं सगळीकडे कौतुक झालं.  सध्या हा अभिनेता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकतीच आशिषने चाहत्यांसोबत एक गुड न्यूज शेअर केली आहे. अभिनेत्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

दरम्यान, नुकतीच सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत अभिनेत्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.  आशिषला पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. लग्नानंतर ५ वर्षांनी अभिनेत्याच्या घरी पाळणा आहे. त्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. "आमचा हात धरण्यासाठी एक इवलासा हात, त्याचं प्रेम सोन्यासारखंच अनमोल, देवाने दिलेली एक अमूल्य भेट, आमची हृदये प्रेमानं ओतप्रोत भरलेली आहेत...मुलगा झाला...कृतज्ञ पालक: प्रियांका आणि आशिष…", असं सुंदर  कॅप्शन लिहून त्याने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे.  सध्या संपूर्ण कलाविश्वातून आशिष आणि त्याच्या पत्नीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

वर्कफ्रंट

आशिष पाथोडेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्याने  'छावा'  तसेच  अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील तो झळकला आहे. आशिष हा एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच तो एक उत्तम लेखक देखील आहे.  घरत गणपती या सिनेमात सुद्धा त्याने काम केलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Chhava' Fame Actor Ashish Pathode Blessed with Baby Boy!

Web Summary : Actor Ashish Pathode, known for 'Chhava,' is now a father! He and his wife, Priyanka, welcomed a baby boy. The couple is overjoyed after five years of marriage. Congratulations are pouring in for the new parents.
टॅग्स :'छावा' चित्रपटसेलिब्रिटीमराठी अभिनेतासोशल मीडिया