Join us
Daily Top 2Weekly Top 5

वीणाने हटवला शिवच्या नावाचा टॅटू; सोशल मीडियावर होतीये ब्रेकअपची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 18:05 IST

Veena jagtap: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून कायम शिव-वीणाकडे पाहिलं जातं. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या दोघांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. 

ठळक मुद्देवीणाने तिच्या मनगटावर शिवच्या नावाचं टॅटू काढलं होतं. परंतु, आता हा टॅटू खोडण्यात आला आहे

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वापासून चर्चेत आलेली जोडी म्हणजे शिव ठाकरे आणि वीणा जगताप.  बिग बॉसच्या घरात या दोघांचं नातं साऱ्यांनीच पाहिलं होतं. त्यानंतर या घरातून बाहेर पडल्यावरही त्यांनी जाहीरपणे त्यांचं नातं कबूल केलं होतं. त्यामुळे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून कायम यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या दोघांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. 

काही दिवसांपूर्वीच वीणा आणि अभिनेत्री अक्षया देवधर या दोघी लेह-लडाखला ट्रीपसाठी गेल्या होत्या. या ट्रीपचे अनेक फोटो, व्हिडीओ दोन्ही अभिनेत्रींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, यामध्ये एक व्हिडीओ पाहून चाहत्यांना प्रचंड धक्का बसला असून शिव आणि वीणाचा ब्रेकअप झाला का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

कोळी गाण्यावर संजनाने धरला ठेका; पाहा रुपाली भोसलेचा जबरदस्त डान्स

वीणाने शेअर केलेल्या अनेक पोस्टमध्ये तिने कारमध्ये बसून एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तिने कारमधून डोकं बाहेर काढलं असून लेह-लडाखमधील वातावरणाचा फिल घेत आहे. मात्र, तिने कारमधून हात बाहेर काढल्यानंतर नेटकऱ्यांना तिच्या हातावरील टॅटू दिसून आला. विशेष म्हणजे या हातावर वीणाने शिवच्या नावाचा टॅटू काढला होता. परंतु, आता त्या टॅटूच्या जागी झाडाचं एक पान गोंदवण्यात आलं आहे. 

वीणाने तिच्या मनगटावर शिवच्या नावाचं टॅटू काढलं होतं. परंतु, आता हा टॅटू खोडण्यात आलं असून त्यावर पान असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे वीणा आणि शिवच्या नात्यात दुरावा आला का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, या प्रकरणी शिव किंवा वीणाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे नेमकं या दोघांच्या नात्यात कोणतं वळण आलं आहे हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

टॅग्स :वीणा जगतापशीव ठाकरेसेलिब्रिटीटेलिव्हिजन