Join us

'...म्हणून मी कोल्हापूरात राहतो', भरत जाधव यांनी उघड केलं मुंबई सोडण्यामागचं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 12:47 IST

अभिनेते भरत जाधव कुटुंबीयांसह मुंबईबाहेर स्थायिक झाले आहेत. मुंबई सोडण्याचा निर्णय का घेतला याचे कारण त्यांनी सांगितले.

लोकप्रिय अभिनेते भरत जाधव गेली कित्येकी वर्ष मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतायत. त्यांच्या अभिनयाने कित्येक चित्रपट अजरामर ठरले. त्यांनी चित्रपटांसोबतच अनेक नाटकांत अजरामर भूमिका केल्या.  त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. काही महिन्यांपूर्वी भरत कुटुंबीयांसह मुंबईबाहेर स्थायिक झाले. आता मुंबई सोडण्याचा निर्णय त्यांनी का घेतला याचे कारण सांगितले आहे.

'आई-बाबांसाठी कायपण म्हणत भरत यांनी थेट मुंबई सोडण्याचा निर्णय घेतलाय. एका मुलाखतीत त्यानं याबद्दल सांगितलंय. ते म्हणाले की, आम्ही कोल्हापूरात जायचो. तेव्हा नेहमी पाहुण्यांकडे उतरायचो. त्यामुळे कोल्हापूर गावात एक स्वत:च घर असावं, अशी माझ्या आई-वडिलांची इच्छा होती. मग मी कोल्हापूरात बंगला बांधला आणि भावंडांना तो दाखवला. पण आई-बाबांना दाखवला नाही. बंगल्याचे व्यवहार झाल्यानंतर तिथे मी कुटुंबाला विमानाने घेऊन गेलो. आई-वडिल तिथे राहिले.आता ते नाहीत. त्यांची इच्छा होती की तिथे कोणी पाहिजे म्हणून मी कोल्हापूरात राहतो'.

भरत जाधव यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ते सध्या चित्रपट, नाटक आणि टेलिव्हिजन क्षेत्रातही कार्यरत आहे. टीव्ही विश्वाबद्दल बोलायचे झाल्यास ते शेवटचे 'सुखी माणसाचा सदरा'मध्ये दिसले होते. शिवाय महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये त्यांच्या नाटकांचे दौरेही सुरू आहेत. अस्तित्व या नाटकाद्वारे पुन्हा एकदा रंगभूमी गाजवण्यास सज्ज आहेत. यापूर्वी त्यांचे सही रे सही, ऑल द बेस्ट, श्रीमंत दामोदर पंत यांसारखी नाटकं खूप गाजली आहेत. 

टॅग्स :भरत जाधवमराठी अभिनेतासेलिब्रिटीकोल्हापूरमुंबई