Join us

बाप तसा लेक! हँडसम आहे ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचा मुलगा, तुम्ही पाहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 18:00 IST

अमेयने देखील आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. नुकतंच त्याने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे.

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. सिनेसृष्टीतील आदर्श जोडपं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गेली अनेक दशकं ऐश्वर्या आणि अविनाश नारकर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मराठी सिनेसृष्टीतील ते एव्हरग्रीन कपल आहेत. वयाची पन्नाशी ओलांडली तरी दोघांचाही फिटनेस, ऊर्जा आणि उत्साह कायम आहे. अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. त्यांचे रील व्हिडिओही व्हायरल होतात. 

ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांना एक मुलगाही आहे. अमेय असं ऐश्वर्या-अविनाश यांच्या लेकाचं नाव आहे. अमेयने देखील आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. नुकतंच त्याने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. खरा इन्स्पेक्टर मागावर या व्यावसायिक नाटकाचं त्याने दिग्दर्शन केलं आहे. अमेयदेखील आईवडिलांइतकाच देखणा आहे. आज बालदिनानिमित्त अविनाश नारकर यांनी लेकाचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. 

अविनाश यांनी अमेयबरोबरचा बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी अमेयला बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "बालदिनाच्या शुभेच्छा...अमेय ... तुला आणि आई बाबांच्या आँखोंका तारा असणाऱ्या सगळ्या बाल गोपाळांना बालदिनाच्या खूप खूप खूप खूप खूप मनापासून शुभेच्छा ...!!", असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. 

सध्या अविनाश नारकर 'सन मराठी'वरील 'कन्यादान' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. तर ऐश्वर्या नारकर झी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत आहेत. 

टॅग्स :अविनाश नारकरऐश्वर्या नारकरमराठी अभिनेता