Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षात अशोक सराफ यांचे व्हॅक्यूम क्लीनर रंगभूमीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 08:00 IST

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ऑनलाईन मागवलाय... नव्या वर्षांत येतोय ही पोस्ट व्हायरल होताना दिसत होती. अखेर या पोस्ट मागचे गुपित उघडं झालं आहे.

ठळक मुद्देव्हॅक्यूम क्लीनर नावाचे नव नाटक नव्या वर्षात रसिकांच्या भेटीला येते आहे

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ऑनलाईन मागवलाय... नव्या वर्षांत येतोय ही पोस्ट व्हायरल होताना दिसत होती. अखेर या पोस्ट मागचे गुपित उघडं झालं आहे. व्हॅक्यूम क्लीनर नावाचे नव नाटक नव्या वर्षात रसिकांच्या भेटीला येते आहे.  या नाटकाचे पोस्टर नुकचेत सोशल मीडियावर आऊट झाले आहे. या अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असल्याचे पोस्टरवरुन समजतेय. या नाटकाचे दिग्दर्शन आणि लेखन चिन्मय मांडेलकर यांने केलंय तर निर्मिती निवेदिता सराफ यांनी केलीय.   

काही दिवसांपूर्वी प्रसाद ओक, निखिल राऊत आणि चिन्मय मांडलेकर यांनी या नाटकसंबंधीत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत सगळ्यांचे लक्ष वेधले होते. या पोस्टमध्ये व्हॅक्यूम क्लीनर नावाचा हॅशटॅग क्रिएट करण्यात आला होता.  मराठी चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेली अनेक मंडळी हेची पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याने या प्रोजेक्टचे नाव व्हॅक्यूम क्लीनर नावाशी संबंधित असल्याचा तर्क तेव्हाच लावण्यात आला होता.  

अशोक सराफ यांच्याबाबत बोलायचे झाले तर ‘मी शिवाजी पार्क’ या सिनेमात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘मी शिवाजी पार्क’ या सिनेमाची कथा-पटकथा, दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे आहे. तर संवाद अभिराम भडकमकर यांनी लिहिले आहेत. ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटाला आणि विशेष करून या चित्रपटातील विक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. 

टॅग्स :अशोक सराफचिन्मय मांडलेकर