Join us
Daily Top 2Weekly Top 5

"रंजना देशमुख खूप चांगली नटी होती...", अभिनेत्रीसोबतच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल काय म्हणाले अशोक सराफ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:14 IST

रंजना देशमुख या मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रियता मिळवलेल्या आणि टॅलेंटेड अभिनेत्री होत्या. त्यांच्यात शिकण्याची खूप जिद्द असल्याचं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले.

सिनेमात काम केलेल्या काही ऑनस्क्रीन जोड्या या प्रेक्षकांच्याही फेव्हरेट असतात. ८०च्या दशकातील अशीच एक जोडी म्हणजे अशोक सराफ आणि रंजना देशमुख. या जोडीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. ऑनस्क्रीनप्रमाणेच ऑफस्क्रीनही त्यांची केमिस्ट्री चांगली होती. रंजना देशमुख या मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रियता मिळवलेल्या आणि टॅलेंटेड अभिनेत्री होत्या. त्यांच्यात शिकण्याची खूप जिद्द असल्याचं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले. याशिवाय त्या कामाच्या बाबतीत अशोक सराफ यांना फॉलो करायच्या, असंही त्यांनी सांगितलं. 

अशोक सराफ यांनी नुकतीच अमुक तमुकला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी रंजना देशमुख यांच्यासोबतच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीवर भाष्य केलं. ते म्हणाले, "रंजना देशमुख खूप चांगली नटी होती. खूप मेहनती होती. एखादी गोष्ट जमत नाही म्हणजे काय...मी हे करून दाखवीनच... मला हे यायलाच पाहिजे. असं तिचं असायचं. ती मला फॉलो करायची हे तिनेच सांगतिलं होतं. मी तुला बघते आणि काम करते, असं ती म्हणाली होती. माझ्यासोबत काम केल्यानंतरचे तिचे रोल बघा. पण, तिच्याकडे शिकण्याची खूप जिद्द होती. त्यामुळे ती ते करू शकली".

रंजना देशमुख आणि अशोक सराफ ही जोडी अनेक सिनेमांमध्ये एकत्र झळकली. 'बिन कामाचा नवरा', 'सासू वरचढ जावई', 'एक डाव भुताचा', 'गोंधळात गोंधळ', 'गुपचूप गुपचूप', 'सुळावरची पोळी' या सिनेमांमध्ये ते एकत्र दिसले होते. 

टॅग्स :अशोक सराफमराठी अभिनेतासेलिब्रिटी