Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तिच्यासोबत माझी चांगली जोडली जमली होती...", रंजना देशमुख यांच्याबद्दल पहिल्यांदाच बोलले अशोक सराफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 12:13 IST

रंजना देशमुख या अशोक मामांच्या आवडत्या अभिनेत्री होत्या. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल खुलासा केला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच अशोक सराफ यांनी रंजना देशमुख यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. 

महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. आजही ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मराठीसोबतच त्यांनी हिंदी सिनेसृष्टीही गाजवली. मनोरंजनविश्वातील या महानायकाने अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. सिनेमांमध्ये त्यांची अनेक अभिनेत्रींसोबत गट्टी जमली. पण, या सगळ्यात रंजना देशमुख या अशोक मामांच्या आवडत्या अभिनेत्री होत्या. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल खुलासा केला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच अशोक सराफ यांनी रंजना देशमुख यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. 

अशोक सराफ यांनी नुकतीच रेडिओ सिटी मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना "तुमची आवडती ऑनस्क्रीन जोडी कोणती?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अशोक सराफ म्हणाले, "खरं सांगायचं तर माझी चांगली जोडी जमली ती रंजनासोबत. ती एक फाइन आर्टिस्ट होती, यात शंकाच नाही. मेहनती कलाकार होती. आपल्याला ही गोष्ट जमत कशी नाही, मी ती करणार...असा तिचा ध्यास सतत असायचं. एवढा जेवढा तुमचा ध्यास असतो तेव्हाच तुम्ही यशस्वी होता. म्हणून ती यशस्वी झाली. तिने सुरुवातीला केलेले सिनेमे मी पाहिले आहेत. ते सिनेमे तिने का केले, असे होते. पण, नंतर तिने स्वत:ला खूप डेव्हलप केले. इंडस्ट्रीत आमच्या जोडीचे जास्त सिनेमे झाले. त्या वेळेला तिची आणि माझी जोडी जमली होती". 

दरम्यान, अशोक सराफ अशी ही जमवाजमवी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबत वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत आहेत. १० एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर, ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे अशा लोकप्रिय कलाकारांची सिनेमात फौज आहे. 

टॅग्स :अशोक सराफमराठी अभिनेतासेलिब्रिटी