अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांची मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी मानली जाते, ज्यांनी 'मायबाप' सिनेमापासून एकत्र काम करण्यास सुरुवात केली. जरी सुरुवातीला ते मित्र नसून व्यावसायिक सहकारी होते, तरीही पंधराहून अधिक सुपरहिट सिनेमांमुळे त्यांची घट्ट मैत्री झाली. लक्ष्या-अशोक-सचिन या त्रिकुटाने ९० च्या दशकात मराठी मनोरंजन विश्वावर राज्य केले. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या या मित्रांची केमिस्ट्री आजही तितकीच ताजी आहे. नुकताच या मैत्रीचा एक सुवर्णक्षण पाहायला मिळाला. यामध्ये अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर हे चक्क एकत्र थिरकताना दिसले.
अभिनेता सुमीत राघवन सध्या 'दोस्ती तुटायची नाय' हे नवीन नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुमीत राघवनच्या या नाटकात त्याच्यासोबत त्याची पत्नी चिन्मयी सुमीत, तसेच शुभंकर एकबोटे आणि अमृता बने हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मैत्रीवर आधारित असलेल्या या नाटकाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नुकतंच 'दोस्ती तुटायची नाय' या नाटकाच्या एका प्रयोगाला अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांनी हजेरी लावली होती.
नाटकातील एका प्रसंगानुसार, सुमीत राघवन प्रेक्षकांमध्ये बसलेल्या या दोन्ही दिग्गजांजवळ पोहोचला. यावेळी तो सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांच्यासोबत 'दोस्ती तुटायची नाय' गाण्यावर थिरकला. अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांना एकत्र पाहून थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. हा खास व्हिडीओ नाटकवेडा मराठी माणूस या इन्स्टापेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
Web Summary : Ashok Saraf and Sachin Pilgaonkar, a popular duo, danced together at a play. Sumit Raghavan's play 'Dosti Tutaychi Nay' features the actors. The audience cheered seeing them dance.
Web Summary : अशोक सराफ और सचिन पिलगांवकर की लोकप्रिय जोड़ी ने एक नाटक में एक साथ नृत्य किया। सुमित राघवन के नाटक 'दोस्ती तुटायची नाय' में दोनों कलाकार हैं। उन्हें नाचते देख दर्शक उत्साहित हो गए।