Join us

आणखी एका चिमुरडीची होणार मराठी सिनेइंडस्ट्रीत एंट्री, जाणून घ्या कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 12:48 IST

सध्या छोट्या पडद्या असो किंवा मोठ्या पडदा बाल कलाकारांचा ट्रेंड सुरु झालाय. प्रत्येक लोकप्रिय मालिकेमध्ये एखाद दुसरा तरी बालकार आहेच.

सध्या छोट्या पडद्या असो किंवा मोठ्या पडदा बाल कलाकारांचा ट्रेंड सुरु झालाय. प्रत्येक लोकप्रिय मालिकेमध्ये एखाद दुसरा तरी बालकार आहेच.  या बालकलाकरांचे सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहेत. आणखी एक चिमुकली बालकलाकार सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'जिप्सी' सिनेमातून बालकलाकार स्वराली कामथे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.  दोनशे मुलींमधून स्वरालीची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली असून, जिप्सी या चित्रपटाचा पुण्यात नुकताच मुहूर्त करण्यात आला. . श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ धनकवडी पुणे येथे जिप्सी या आगामी सिनेमाचा मुहूर्त संपन्न झाला. 

जिप्सीतील प्रमुख भूमिकेसाठी सात-आठ वर्षांची बालकलाकार हवी होती. मात्र तिच्याकडे अभिनयाव्यतिरिक्त अन्य कौशल्यं असणंही आवश्यक होतं. त्यानुसार सुरुवातीला दोनशे मुलींची प्रोफाईल तपासण्यात आली. पुण्यात ऑडिशन ठेवण्यात आली. सत्तर ऐंशी बाल कलाकार ऑडिशनला आले. त्यातील भूमिकेला चपखल बसणारी स्वराली कामथेही होती. जेजुरीला राहणारी स्वराली तिसरीत शिकत आहे.

स्वराली नृत्यात निपुण आहे. त्याशिवाय ती तायक्वांदो, पार्कओव्हर, जिम्नॅस्टिक्सही शिकते. त्यासाठी ती आईबरोबर रोज जेजुरी ते पुणे प्रवास करते. त्यामुळे अत्यंत कष्टाळू असलेल्या स्वरालीमुळे जिप्सीतील भूमिकेला चार चाँद लागतील यात शंका नाही. जिप्सी या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं होतं. तर चित्रपटाचं चित्रीकरणही लवकरच सुरू होणार आहे. 

टॅग्स :सिनेमा