Join us

"...आणि आयुष्यच पालटून गेलं", 'सैराट' फेम अभिनेता सुरेश विश्वकर्माची पत्नीसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 16:10 IST

Suresh Vishwakarma : 'सैराट' फेम अभिनेता सुरेश विश्वकर्माने सोशल मीडियावर पत्नीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

'सैराट' (Sairat Movie) सिनेमातून अभिनेता सुरेश विश्वकर्मा (Suresh Vishwakarma) घराघरात पोहचले आहे. त्याने या चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिता साकारली होती. त्यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली आहे. या चित्रपटानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. सुरेश सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतात. दरम्यान आता सुरेश विश्वकर्माने सोशल मीडियावर पत्नीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

सुरेश विश्वकर्माने पत्नी विद्याचा फोटो शेअर करत लिहिले की, विद्या..तू आयुष्यात आलीस आणि आयुष्यच पालटून गेलं. फक्त अभिनेता बनणे एवढं एकच स्वप्न माहीत असणाऱ्या मला संसाररूपी दुसरं एक तरल, सुंदर स्वप्न तू दाखवलं आणि आता तपभराचा हा प्रेमळ प्रवास असाच एकमेकांच्या सोबतीने कडेला नेऊ. अशीच तहहयात साथ दे. परमेश्वर तुला सुखी, समाधानी, निरोगी आयुष्य बहाल करो हीच त्याच्या चरणी प्रार्थना..!! ऐ जिंदगी..तुला जन्मदिनाच्या महा अशॊहिनी शुभेच्छा..!!

सुरेश विश्वकर्मा यांच्या पोस्टवर त्यांचे चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. सुरेश विश्वकर्माच्या पत्नीचे नाव विद्या विश्वकर्मा आहे. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव ओवी आहे. अभिनेत्याची पत्नी लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.

वर्कफ्रंटसुरेश विश्वकर्मा यांनी लोकनाट्य प्रकारात मावशी, सोंगाड्यापासून वगातील सर्व मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विश्वकर्मा गावातून मुंबईत आले आणि त्यांच्या स्ट्रगलला सुरुवात झाली. या दरम्यान त्यांनी स्टेज शो, मालिका, चित्रपटांपासून ते अगदी पथनाट्यांमध्येही काम केले. पण, त्यांना खरी ओळख मिळाली ती नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटामुळे. सुरेश विश्वकर्माने सैराट चित्रपटाशिवाय रेगे, महिमा खंडोबाचा, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपटात झळकले आहेत. 

टॅग्स :सैराट 2